Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*'स्टार प्लस’ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, सासू-सुनेची नवी ‘आँख मिचोली’!* https://

*'स्टार प्लस’ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, सासू-सुनेची नवी ‘आँख मिचोली’!* https://www.instagram.com/reel/C1TjvujPGrD/?igsh=YzZhZTZiNWI3Nw== _खुशी दुबे आणि नवनीत मलिक यांची भूमिका असलेली ‘आँख मिचोली’ आहे, एका गुप्त पोलिसाची कथा!_
‘स्टार प्लस’ वाहिनी ही आपल्या दर्शकांना रंजक आणि वेधक कार्यक्रम उपलब्ध करून देण्याकरता ओळखली जाते. मालिकांद्वारे विविध भावभावनांचा हिंदोळा प्रेक्षकांना अनुभवता यावा, याकरता ‘स्टार प्लस’ वाहिनी अत्यंत चोखंदळपणे मालिका प्रेक्षकांपुढे सादर करते. या वाहिनीवरील मालिकांची विस्मयकारक यादी पाहिली तरी लक्षात येते, की प्रेक्षकांचे केवळ रंजन नाही, तर सबलीकरण करण्याचीही ताकद या मालिकांमध्ये आहे. या यादीत ‘अनुपमा’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘तेरी मेरी दूरियाँ’, ‘इमली’, ‘ये है चाहतें’, आणि ‘बातें कुछ अनकही सी’ अशा एकाहून एक सरस मालिकांचा समावेश आहे, ज्या कौटुंबिक नाट्य आणि प्रेमकथेवर केंद्रित आहेत आणि या मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही परंपरा कायम ठेवत, ‘स्टार प्लस’ने आजवर प्रवेश न केलेल्या विषयाला हात घातला आहे. ‘स्टार प्लस’ने खुशी दुबे आणि नवनीत मलिक यांची भूमिका असलेल्या नव्या गुप्त पोलिसाच्या कथेवर आधारित ‘आँख मिचोली’ या मालिकेची घोषणा केली आहे. शशी सुमीत प्रॉडक्शन्स निर्मित, ‘आँख मिचोली’ ही वेधक कथा पाहताना प्रेक्षकांची नजर त्यांच्या दूरचित्रवाणी संचावर नक्की खिळून राहील, असा विश्वास ‘स्टार प्लस’ वाहिनीने व्यक्त केला आहे.
‘आँख मिचोली’च्या निर्मात्यांनी या पोलीस नाट्यावर आधारित मालिकेचा एक वेधक प्रोमो प्रदर्शित केला आहे. या ‘प्रोमो’त रुक्मिणी (खुशी दुबे) एकीकडे गुंडांशी लढणारी गुप्त पोलिस म्हणून दाखवण्यात आली आहे आणि दुसरीकडे, लग्न करून स्थिरस्थावर होण्यासाठी रुक्मिणीचे कुटुंब तिला भाग पाडत असतात आणि आपण प्रतिष्ठित अधिकारी व्हावे, अशी रुक्मिणीची मनापासून इच्छा आहे. ही खरोखरीच एक अतिशय रंजक कथा आहे, जी समाजाचे आणखी एक वास्तव अधोरेखित करेल. ‘आँख मिचोली’ ही सासू-सुनेची एक अनोखी कथा आहे. रुक्मिणीचा अनोख्या वाटेवरचा प्रवास आणि ती तिची उद्दिष्टे कशी साध्य करते हे पाहणे वेधक ठरेल की लग्नामुळे तिचे आयपीएस अधिकारी होण्याचे पंख छाटले जातील, हे लवकरच प्रेक्षकांना स्पष्ट होईल. शशी सुमीत प्रॉडक्शन निर्मित, ‘आँख मिचोली’ मालिका लवकरच ‘स्टार प्लस’ वाहिनीवरून प्रसारित होईल!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.