*दुबईत रंगला सुवर्णपर्व एकांकिका करंडक !*
December 04, 2023
0
*दुबईत रंगला सुवर्णपर्व एकांकिका करंडक !*
एम.पी.एफ.एस म्हणजेच महाराष्ट्र मंडळ दुबई, यंदा सुवर्णपर्व दिमाखात साजरे करत आहे. गेली दोन वर्षे करोनाच्या प्रादुर्भावामुळे एकांकिका स्पर्धा होऊ शकली नाही, पण यंदा मात्र ही स्पर्धा म्हणजेच *सुवर्णपर्व एकांकिका करंडक २०२३* मंडळाच्या ५० व्या वर्षात जल्लोषात पार पडला.
प्राथमिक फेरीत पूर्ण युएई तून सहभागी झालेल्या११ एकांकिका सादर झाल्या आणि त्यातून विनोदी, कौटुंबिक, सामाजिक अशा विविध आशयाच्या अव्वल ६ एकांकिका अंतिम फेरी दाखल झाल्या. अंतिम फेरी जल्लोषात पार पडली. वैशिष्ट्य म्हणजे 11 पैकी 9 एकांकिका स्वलीखित होत्या.
निलेश देशपांडे दिग्दर्शित आणि योगेश सोमण लिखित"श्री तशी सौ" ह्या नाटकाने सर्वोत्कृष्ट एकांकिका, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री अशी सर्व पारितोषिक पटकावली. प्रकाश केळकर लिखित "अनुभूती" ने दुसरं तर अश्विनी धोमकर लिखीत आणी दिग्दर्शित "वळण" ने तिसरं पारितोषिक मिळवलं. प्रेक्षकांची नीवड "चक्रव्यूह" ठरलं. कार्यक्रमाच सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष देवेन्द्र लवाटे यांनी केलं.
अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व श्री. राजेश देशपांडे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. भारता बाहेर राहून सुद्धा या कलाविष्कारावर नुसतेच प्रेम नाही तर सादरीकरणात गाठलेल्या उंचीचे त्यांनी कौतुक केले आणि त्याबरोबर काम सांभाळून सहभागी झालेल्या प्रतिभावान कलाकारांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले आणि प्रोत्साहनही दिले.
अशा या चुरशीच्या अंतिम स्पर्धेत पारितोषिकांवर मोहर उमटवणारे संघ व सहभागी नावे खालील प्रमाणे,
*सांघिक पारितोषिके :*
सर्वोत्कृष्ट एकांकिका : श्री तशी सौ
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय पारितोषिक : अनुभूती
सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय पारितोषिक : वळण
विशेष उल्लेखनीय पारितोषिक : परमोच्यबिंदू आणि म्ह्या
सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रेक्षकांची निवड : चक्रव्यूह
*वैयक्तिक पारितोषिके:*
सर्वोत्कृष्ट अभिनेता : निखिल फडके, प्रशांत फडणीस आणि मनोज कुलकर्णी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : तेजस्विनी घैसास , प्रिया तेलवणे जाधव आणि अश्विनी धोमकर
सर्वोत्कृष्ट लेखक : प्रकाश केळकर आणि स्नेहल देशपांडे
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : निलेश देशपांडे
सर्वोत्कृष्ट नेपथ्य : स्वाती खारकर
सर्वोत्कृष्ट पोस्टर : जयंत जोशी आणि अभिजीत भागवत
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र मंडळाने *कला कार्यशाळेचे* आयोजन केले, त्यामध्ये जवळजवळ ५० च्या वर हरहुन्नरी रंगकर्मी आणि त्याच बरोबर नाटकप्रेमींनी सहभाग नोंदवला. परदेशात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्याअश्या कार्य शाळेत श्री. राजेश देशपांडे यांनी अभिनय, संवाद फेक, उच्चार, देहबोली, सांघिक कौशल्य आणि नाट्यकले संदर्भातील विविध बाबींवर मोलाचे मार्गदर्शन केले.
हे दोन्हीही उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. देवेंद्र लवाटे, उपाध्यक्ष श्री.निलेश देशपांडे आणि सचिव श्री.महेश धोमकर यांचा महत्वपूर्ण सहभाग होता.