Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पिल्लू बॅचलर" चित्रपटाचा ट्रेलर लाँच, प्रेक्षकांची होणार पुरेपूर हसवणूक

पिल्लू बॅचलर" १५ डिसेंबरला राज्यभरात सर्वत्र प्रदर्शित होणार वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाच्या फोडणीतून "पिल्लू बॅचलर" हा चित्रपट प्रेक्षकांची पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला असून, हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन तानाजी घाटगे यांनी केलं आहे. बस्ता, बरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी या पूर्वी दिले आहेत. मंगेश कागणे यांनी गीतलेखन, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन, अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे, भारत गणेशपूरे, सविता मालपेकर, अक्षय टांकसाळे, किशोर चौघुले असे उत्तमोत्तम कलाकार आहेत.
वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्षाची गोष्ट चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. मात्र प्रेमकथा, त्याला हलक्या विनोदाचा तडका चित्रपटात असल्याचं चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे हा चित्रपट पुरेपूर मनोरंजन करणारा ठरतो. "पिल्लू बॅचलर"नं नावापासूनच उत्सुकता निर्माण केली आहे. त्यामुळे मनसोक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना केवळ १५ डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. ट्रेलर लिंक https://youtu.be/ZJQZe13KWdc?si=0aBT0XBywApM6NkN

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.