दोन भिन्न स्वभाव , दोन नव्या गोष्टी - 'पारू' आणि 'शिवा'*
December 28, 2023
0
*दोन भिन्न स्वभाव , दोन नव्या गोष्टी - 'पारू' आणि 'शिवा'*
झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर एक नवीन प्रोमो सगळ्यांनी पाहिलाच असेल. झी मराठी लवकरच घेऊन येत आहे आपल्या प्रेक्षकांसाठी दोन सुंदर मालिका 'पारू' आणि 'शिवा'. दोन नव्या मालिका , दोन नव्या नायिका, दोन नव्या गोष्टी. माणुसकीला जपणारी , आपुलकीने वागणारी, मनसोक्त हसणारी, नितळ पारू जणू झरझरणारा अवखळ झरा. अश्या नटखट अवखळ निष्पाप पारूची भूमिका साकारणार आहे
*'शरयू सोनावणे'*. अगदी त्याच्या विरुद्ध अन्यायाला भिडणारी, हक्कासाठी लढणारी, बिंधास्त जगणारी, निडर 'शिवा' , जणू धगधगता पेटता निखारा. ह्या निखाऱ्याचं नाव आहे *'पूर्वा अमोघ फडके'*. तर अश्या ह्या दोन भिन्न स्वभाव, दोन नव्या गोष्टी प्रेक्षकांना आपलंस करून घेतील ह्यात शंकाच नाही.
येतात तुमाला भेटायला ‘शिवा’ आणि ‘पारू’ लवकरच नवीन वर्ष्यात तुमच्या लाडक्या झी मराठी वाहिनीवर !