Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आदर्श शिंदे म्हणतोय 'एन्जॉय एन्जॉय'

नव्या वर्षात करा 'एन्जॉय एन्जॉय' आदर्श शिंदे म्हणतोय 'एन्जॉय एन्जॉय' - १९ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाचं गाणं लाँच नव्या वर्षाच्या स्वागताला नाचण्याचा पुरेपूर आनंद मिळणार आहे. ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाचं एन्जॉय एन्जॉय हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून शुभंकर तावडे, प्रियंका जाधव या गाण्यात आहेत. ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट नव्या वर्षात १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.
उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते यांनी ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्माती केली आहे, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी - सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथालेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत, तर अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी या चित्रपटाने केली आहे. ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट एका महत्त्वाच्या विषयावर बेतला आहे. एन्जॉय एन्जॉय हे गाणं आयुष्य साजरं करण्याचा संदेश देते. गणेश निगडे यांनी लिहिलेल्या या गाण्याला सुहित अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केेलं आहे. तर आदर्श शिंदे आणि सुहित अभ्यंकर यांनी हे गाणं गायलं आहे. प्रत्येकाला ठेका धरायला लावणारं हे गाणं आहे. त्यामुळे नव्या वर्षाचं स्वागत करताना एन्जॉय एन्जॉय तर व्हायलाच हवं. Song Link https://youtu.be/y1dX6Nh42ro

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.