Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मराठी असू तर बोलूही मराठीच 'आईच्या गावात मराठीत बोल'

मराठी असू तर बोलूही मराठीच 'आईच्या गावात मराठीत बोल'
कोणत्याही चित्रपटाचे प्रदर्शन हीच एक अफलातून बाब असते आणि अशा मराठी चित्रपटात जर जबरदस्त असा नैसर्गिक आणि खळखळून हसवणारा विनोद असेल तर चित्रपटाचे प्रदर्शन होण्याआधीच त्याची धमाल चर्चा सुरु होते. असाच एक मराठी चित्रपट आहे 'आईच्या गावात मराठीत बोल'
‘आईच्या गावात मराठीत बोल’ चे ट्रेलर आणि संगीत अनावरण मुंबई मध्ये सर्व कलाकार , तंत्रज्ञ आणि मिडीया यांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटाद्वारे ओमी वैद्यची भन्नाट मराठी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आणि त्यावर ते तद्दन खूश आणि हसून लोटपोट होणार आहेत. याला ओमीच्या नव्या भाषेचा चमत्कार म्हणायचे की विनोदाची एक नवी भाषा म्हाणायचे हे प्रेक्षकांनी ठरवायचे आहे.
चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये मराठी मुलीसोबत लगीनगाठ बांधली की तिच्या वडिलांची संपत्ती आपलीच असा विचार करून परदेशस्थ समर (ओमी) भारतात येतो. दोन महत्वाची कामे घेऊन तो आलेला आहे. एक म्हणजे मराठी मुलगी शोधणे आणि दुसरे आणि अधिक महत्वाचे अस्खलित मराठी बोलायला शिकणे ही कामे त्याला करायची आहेत. भारतातला या संबंधातला त्याचा प्रवास चित्रपटात बघायला मिळणार आहे. त्यात लग्नासाठीचा खटाटोप तर तुम्हाला गुदगुल्या करेलच पण पुढे जे काही घडणार आहे त्याने तर तुम्ही लोटपोट होणारच आहात. तर १९ जानेवारी २०२४ निश्चित करून ठेवा. मुहूर्त चुकवू नका...
‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटाची गाणी व्हिडिओ पॅलेसची प्रस्तुती आहे तर संगीत आणि पार्श्वसंगीत अविनाश विश्वनाथ यांचे आहे. 'आईच्या गावात मराठीत बोल' या शीर्षक गीताचे धमाल बोल वैभव जोशी यांनी लिहीले आणि ठेका धरायला भाग पाडणाऱ्या या गीताला स्वप्निल बांदोडकर, विश्वजीत जोशी, मनीष राजगिरे आणि रोहित राऊत यांनी अस्सल मराठी आवाज दिला आहे. ‘तू हवीशी’ हे गाणे विश्वजीत जोशी यांनी लिहले आहे . तर ऋषिकेश रानडे याने गायलेलं गाणं कॉमेडीची मेजवानी असलेल्या चित्रपटात सुद्धा रोमॅंटीक माहोल तयार करत आहे. 'आईच्या गावात मराठीत बोल ' चे शिर्षक गीत चित्रपटाला शोभेल असं विनोदी पण तितकंच अर्थपूर्ण असे आहे अशी भावना संगीतकार अविनाश विश्वजित यांनी व्यक्त केली . ओमी वैद्य आणि अमृता हर्डीकर यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहून चित्रपटाची आखणी सुरु केली आणि दोघांनी तेथूनच संचबांधणीही सुरु केली.सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी योगेश कोळी यांनी तर संकलन मयूर हरदास आणि ओमी वैद्य यांनी सांभाळले आहे. ओमी वैद्य आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटात दिग्दर्शक आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारतो आहे त्याची उत्तम अभिनयाची छाप कायम असतानाच चित्रपटाच्या ट्रेलरमधून त्याची दिग्दर्शनाची बाजू भक्कम आहे हेही दिसते आहे. त्याचा आणि सहकलाकारांचा चित्रपटातील सहज वावर प्रेक्षकांची मने निश्चित जिंकू शकेल असा आहे.
‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटामढील प्रमुख भूमिका ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार, सायली राजाध्यक्ष आणि सुधीर जोगळेकर अशी दमदार आहे. या चित्रपटाची निर्मिती अहमद लुकान, डॉ.जलदीप दलूत, पीट टॉरमे, नंदिनी मिनॉशे, सामिया अश्रफ, डॉ. पुनीत चांडक, डॉ. सुमुल रावल, मॉंटी आणि तनु पांडे, संतोष गोविंदराजू, मार्थेश्वरन सोलामुथू, माईक कासिन, जसलीन अहलुवालिया, राजन वासुदेवन, राजीव आणि शीतल शाह, संजय सहगल, शाहीन गांधी, स्टीव्हन मोरलँड, सुप्रतीम डे आणि उदय कुमार यांनी केली आहे. आता थोडीशीच वाट बघायची आहे..१९ जानेवारीची... तयार आहात ना...काहीतरी आगळं वेगळं मिंग्लिश ऐकायला आणि बघायला !!!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.