ब्रँड' हा रोमँटिक चित्रपट २४ डिसेंबर २०२४ रोजी होणार प्रदर्शित*
December 05, 2023
0
*तरुण दिग्दर्शक नवनाथ निकम दिग्दर्शित 'ब्रँड' हा रोमँटिक चित्रपट २४ डिसेंबर २०२४ रोजी होणार प्रदर्शित*
*नवनाथ निकम दिग्दर्शित 'ब्रँड' या प्रेमाची परिभाषा मांडणाऱ्या चित्रपटात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जस्ट सुलची धमाकेदार एंट्री*
*तरुण दिग्दर्शक नवनाथ निकमने घातलीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जस्ट सुलला भुरळ, 'ब्रँड' चित्रपटात करणार एकत्र काम*
*अबब! नवनाथ निकम व सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जस्ट सुलची जोडी 'ब्रँड' या चित्रपटात करणार धमाका*
सध्या मराठी चित्रपटांची लाट आलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज होत आहेत. चित्रपटातील कलाकारांच्या या अभिनयासह आता सोशल मीडिया इन्फ्लुएंसरही चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी पुढे सरसावले आहेत. अनेक मराठी चित्रपटांमध्ये हे मीडिया इन्फ्लुएंसर लहानसहान भूमिका साकारून मोठा पडदा गाजवतात. अशातच मिलियन व्युजच्या घरात लोकप्रिय असलेला जस्ट सुल आता लवकरच मोठा पडदा गाजवायला सज्ज होणार आहे.
'बिग बॉस' फेम अब्दू रोजीकचा जिगरी अशी ओळख असलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जस्ट सुलने आजवर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लाखो प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता हा जस्ट सुल एका मराठमोळ्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. सुप्रसिद्ध व तरुण दिग्दर्शक नवनाथ निकमने आजवर अनेक हिट मराठी गाण्यांच्या दिग्दर्शातून आपले नाव कमावले आहे. आता नवनाथ निकम त्याचा आगामी 'नवस्त्य एंटरटेनमेंट' निर्मित 'ब्रँड' हा मराठमोळा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहे.
'ब्रँड' या रोमँटिक चित्रपटात नेमकी कोणती झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. मात्र चित्रपटात जस्ट सुलची धमाल मस्ती प्रेक्षकांना नक्कीच मोहिनी घालणार यांत शंकाच नाही. याबाबत चित्रपटाचा दिग्दर्शक नवनाथ निकम याने म्हटलं की, "'ब्रँड' हा माझा आगामी रोमँटिक चित्रपट लवकरच मोठया पडद्यावर येत आहे. चित्रपटात प्रेक्षकांना धमाल, मस्ती व रोमान्स अनुभवायला मिळेल, तसेच जस्ट सुलच्या एन्ट्रीने चित्रपटाची रंगत दुप्पट झालेली पाहायला मिळेल. आम्ही सर्वांनी मिळून केलेली धमाल अर्थातच प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास मदत करेल. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा माझा अनुभव कायम मला लक्षात राहील".
'ब्रँड' हा आगामी प्रेमाची अनोखी परिभाषा मांडणारा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २० डिसेंबर २०२४ ला मोठया पडद्यावर प्रदर्शित होईल.