द फिशरमन्स डॉटर' मतभेदांच्या कोलाहलात समानता शोधण्याचा प्रयत्न करतो : दिग्दर्शक एदगार डी लुक जेकोम
November 25, 2023
0
द फिशरमन्स डॉटर' मतभेदांच्या कोलाहलात समानता शोधण्याचा प्रयत्न करतो : दिग्दर्शक एदगार डी लुक जेकोम
द फिशरमन्स डॉटर' या चित्रपटाचे दिग्दर्शक एदगार डी लुक जेकोम म्हणाले की "आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या वागण्यात आणि जगण्याच्या पद्धतीबाबत मतभेद आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला माणूस म्हणून समानतेचे धागे सापडू शकतात आणि तेच मी माझ्या चित्रपटातून शोधण्याचा प्रयत्न करत आहे. या चित्रपटात एका मच्छीमाराची कथा आहे ज्याचे कणखर व्यक्तिमत्व आहे आणि दुरावलेल्या मुलीशी त्याची झालेली भेट याचे चित्रण आहे. 54 व्या इफ्फीच्या निमित्ताने चित्रपट दिग्दर्शकाने आज पत्रकारांशी संवाद साधला.

दिग्दर्शकाबद्दल थोडेसे :
एदगर डी लुके जेकोमचा लघुपट सिन रेग्रेसो (2007) बियारिट्झ आणि सॅंटियागो येथील महोत्सवांमध्ये होता. त्याने युनिव्हर्सिडॅड डेल नॉर्टे येथे कम्युनिकेशन्समध्ये प्रावीण्य मिळवले आणि रॉबर्टो फ्लोरेस प्रिएटो यांच्या रुइडो रोसा (2014) आणि लिबिया स्टेला गोमेझ यांच्या एला (2015) मध्ये ते सहाय्यक दिग्दर्शक होते. त्याच्या तीन पटकथांसाठी एफडीसीचे पटकथालेखन उत्तेजनपर पुरस्कार त्यांनी पटकावला आहे. ते अनेक वर्षे युनिव्हर्सिडॅड डेल मॅग्डालेना येथे प्राध्यापक होते.