Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

No title

शिवाली परब झालीय 'मासोळी ठुमकेवाली' *शिवाली परब,अभिजित अमकर चा नवा म्युझिक व्हिडीओ* *सप्तसुर म्युझिक चा नवा कोरा व्हिडिओ*
सातत्याने दर्जेदार म्युझिक व्हिडिओ सादर करणाऱ्या सप्तसूर म्युझिकतर्फे मासोळी ठुमकेवाली हा नवा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. अभिनेत्री शिवाली परब आणि अभिजित अमकर यांची जोडी या गाण्यात दिसणार आहे. ताल धरायला लावणारं हे गाणं सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकची निर्मिती असलेल्या मासोळी ठुमकेवाली या म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन कृतिक माझिरे यांनी केलं आहे.हर्ष करण आदित्य (त्रिनिती ब्रोस) यांच्या शब्दांना हर्षवर्धन वावरे, करण वावरे, आदित्य पाटेकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. कस्तुरी वावरे, आदित्य पाटेकर यांनी हे गाणं गायलं आहे. रोहन कंटक, निखिल वराडकर यांनी छायांकन केलं आहे. या गाण्यात शिवाली परब आणि अभिजित अमकर हे मराठी चित्रपट, मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय कलावंत आहेत. अंकित शिंदे आणि दिव्या घाग यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.
मराठी गाण्यांमध्ये कोळी गीतांचं वेगळंच महत्त्व आहे. अनेक कोळीगीतं आजही संगीतप्रेमींच्या तोंडी असतात. त्यात आता आली हो मासोळी ठुमकेवाली असे शब्द असलेल्या मासोळी ठुमकेवाली या गाण्याची भर पडणार आहे. उत्तम शब्द असलेलं हे गाणं प्रत्येकालाच ताल धरायला लावणारं आहे. त्यामुळे शिवाली परबची मासोळी ठुमकेवाली संगीतप्रेमींच्या आणि शिवालीच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरेल यात काहीच शंका नाही. *Song Link* https://youtu.be/XDqhCrP_oBA?si=ZPmSpR-E3sCkg2gA

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.