Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उत्कर्ष वानखेडेवर कौतुकाचा वर्षाव

*उत्कर्ष वानखेडेवर कौतुकाचा वर्षाव झाला, तर मिथुन आणि कुमार सानू यांनी मिळून आशिकी 1 आणि आशिकी 2 चा संगम घडवून आणला* या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 14 या अत्यंत प्रतिष्ठित गायन रियालिटी शोमध्ये मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, गीतकार आणि गायक मिथुन येणार आहे. मिथुनचे प्रथमच या शो मध्ये भव्य आगमन होणार आहे. त्याच्या सन्मानार्थ स्पर्धकांना ‘मिथुन मेलडी चॅलेंज’ देण्यात येईल, ज्यात स्पर्धकांना आपले गान कौशल्य दाखवून मिथुनला प्रभावित करावे लागेल. टॉप 10 स्पर्धकांपैकी सर्वश्रेष्ठ स्पर्धकाला प्रशस्तीच्या रूपात 21st सेंचुरीच्या अत्यंत गाजलेल्या ‘तुम ही हो’ गाण्याचे फर्स्ट ड्राफ्ट लीरिक्स जिंकण्याची संधी मिळेल.
नागपूरचा उत्कर्ष वानखेडे ‘तुम ही हो’ (आशिकी 2) आणि ‘तुझे कितना चाहने लगे’ (कबीर सिंह) ही गाणी अप्रतिम सादर करून सर्वांचे मन जिंकताना दिसेल. उत्कर्षच्या गायकीने प्रभावित झालेली श्रेया घोषाल म्हणाली, “उत्कर्ष, तुझ्यात कमालीचा बदल झालाय! तुझ्या गाण्यात खूपच परिपक्वता होती. मला वाटते, ही मिथुनची जादू आहे. मंचावर जे घडले ते अद्भुत होते!” त्यानंतर मिथुनने आशिकी 1 ची गाणी गाणाऱ्या कुमार सानूसोबत पॅनलवर येण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तो म्हणाला, “’तुम ही हो’ हे गाणे करताना मी खूप काही शिकलो. आणि जर या गाण्याच्या मुळाशी आपण गेलो तर हे लक्षात येईल की, आशिकी 2 चा पाया म्हणजे पाहिला आशिकी चित्रपट आहे, ज्याच्याशी नदीम-श्रवण आणि कुमार सानू यांसारखे दिग्गज कलाकार निगडीत आहेत. या गाण्याशी माझे जे व्यक्तिगत नाते आहे, ते देखील खूप गहिरे आहे, कारण माझे वडील नरेश शर्मा यांनी या गाण्याची म्युझिक अरेंजमेंट केली होती. त्यांनी सानू दांसोबत अनेक प्रोजेक्टवर एकत्र काम केले आहे.” त्याने आशिकी 1 आणि आशिकी 2 चे मिलन घडवून आणण्याची कल्पना मांडली आणि त्यानंतर जे झाले ते असामान्य होते! परीक्षक कुमार सानू, श्रेया घोषाल आणि विशाल दादलानी यांनी मिथुन सोबत ‘तुम ही हो’ परफॉर्म केले! या परफॉर्मन्सला सगळ्यांनी मनापासून दाद दिली. तो खरोखर आशिक 1 आणि आशिकी 2 चा संगम घडवणारा क्षण होता!
बघायला विसरू नका, इंडियन आयडॉल सीझन 14 या शनिवारी आणि रविवारी रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.