Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*`शॉर्ट अँण्ड स्वीट’ ला प्रेक्षकांची पसंती*

*`शॉर्ट अँण्ड स्वीट’ ला प्रेक्षकांची पसंती* नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शॉर्ट अँण्ड स्वीट` चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. खरंतर चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर ही प्रतीक्षा संपली असून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट भावनिक तसेच गोड कथा असल्याने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपट पाहून आल्यावर चित्रपटगृहातून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांकडून ‘शॉर्ट अँण्ड स्वीट’ला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. या चित्रपटाचे अनेक शोज हाऊसफुल्ल असून चित्रपटातील कलाकारांनी चित्रपटगृहांना भेट देऊन प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहेत. प्रेक्षकही आवर्जून कलाकारांना भेटून चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. यावेळी काही स्पेशली चँलेज प्रेक्षकांनीही हा चित्रपट पाहून भरपूर कौतुक केले. या चित्रपटात एखाद्याचे व्यंगत्व न दाखवता त्यांची सकारात्मक बाजू दाखवण्यात आली आहे.
शुभम प्रोडक्शन प्रस्तुत पायल गणेश कदम, विनोद राव निर्मित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, श्रीधर वत्सर,हर्षद अतकरी आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोनालीबरोबरच चित्रपटातील बाकी कलाकरांना आणि त्यांच्या व्यक्तिरेखांवर सोशल मीडियाद्वारे त्यांच्या फॅन्सकडून भरभरून प्रेम मिळतंय. याबद्दल दिग्दर्शक गणेश दिनकर कदम म्हणतात, "चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून खरच खूप आनंद होत आहे. असेच प्रेम चित्रपटावर करत राहा. प्रेक्षकांचे यासाठी मनापासून आभार त्यांना आमचा हा गोड प्रयत्न आवडतोय.’’

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.