Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गाफील’ चित्रपटाचे टीझर रिलीज; उत्सुकता वाढवणारा टीझर*

*‘गाफील’ चित्रपटाचे टीझर रिलीज; उत्सुकता वाढवणारा टीझर* मिलिंद अशोक ढोके लिखित-दिग्दर्शित ‘गाफील’* *- १५ डिसेंबरला हा चित्रपट होणार महाराष्ट्रभरात प्रदर्शित* 'गाफील' या आगामी मराठी चित्रपटाचे टीझर नुकतेच रिलीज करण्यात आले आणि काही अवधितच या टीझरला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. आदित्य या तरूणाच्या आयुष्याभवती फिरणारी कथा या टीझरमध्ये दिसून येते. तसेच हा टीझर अनेक प्रश्न‌ मनात ठेवून जातो.
'गाफील' या नावातच ताकद असल्याने प्रेक्षकांची या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. नवोदित कलाकार आदित्य राज आणि अभिनेत्री वैष्णवी बरडे या दोघांच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असेल. मात्र, त्यांचं नक्की नातं काय हा प्रश्न औत्सुक्याचा ठरतो. काहीसा ऐशोआरामात राहणारा, आजूबाजूला सतत मुलींचं जाळं असणारा नायक अचानक बदलतो, याचं कारण काय, ती मुलगी नक्की कोण आहे, असे अनेक प्रश्न टीझर पाहिल्यावर आपल्या मनात येतील. त्यामुळे आता प्रेक्षक ट्रेलरच्या प्रतिक्षेत आहेत. टीझर आणि म्युझिक लॉन्चचा कार्यक्रम अमरावती येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री, विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे पाटील उपस्थित होते. तसेच स्टार प्रवाहचे कार्यकारी निर्माते नरेंद्र मुधोळकर यांची विशेष उपस्थिती होती.
धरती फिल्मस प्रस्तुत व निर्मित, मॅड आर्क पिक्चर्स सहनिर्मित ‘गाफील’ या चित्रपटाचे निर्माते मनोज भेंडे आणि आलेख अग्रवाल हे आहेत, तर मिलिंद अशोक ढोके हे चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक आहेत. १५ डिसेंबरला हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.