Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लावण्य दरबार" हा दर्जेदार लावणी नृत्यआविष्कार ११ नोव्हेंबर रोजी शिवाजी मंदिर दादर येथे सादर होणार

अभिजात लावणी संस्कृतीला जीवंत ठेवणारा "लावण्य दरबार" हा दर्जेदार लावणी नृत्यआविष्कार शनिवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता शिवाजी मंदिर दादर येथे सादर होणार.
नृत्य, संगीत अन अभिनयाचे सुंदर सादरीकरण म्हणजे 'लावणी'. या शब्दात सौंदर्य असत कि नृत्यासाठी खास शब्द लिहिले जातात याचं गुपित कोणास ठावूक पण लावणीचं रूप मनात भरल्या वाचून राहत नाही. लावणी म्हणजे फक्त शृंगार नव्हे तर डौलदार नृत्याद्वारे प्रिती आणि भक्ती यांचा अविष्कार. अगदी नावातच लावण्य… सादर होणाऱ्या प्रत्येक लावणीची एक वेगळी कहाणी किंवा प्रत्येक कहाणीला एक लावणी लागू करता येईल इतकी ती मार्मिक असते. लावणीत शृंगार आहे, लटका राग आहे, रंग आहे, कौतुक आहे, आग्रह आहे, स्तुती आहे, वर्णन आहे, संवाद आहे, रुसवा आहे, प्रीत आहे……. ही जाणीव ठेवून अस्सल अभिजात लावणीची रसिकांना ओळख व्हावी या हेतूने आणि अभिजात लावणी संस्कृतीला जीवंत ठेवण्याचे काम "लावण्य दरबार" हा दर्जेदार लावणी नृत्यआविष्कार कार्यक्रम सादर करून प्रसिद्ध नाट्य निर्माते हरी पाटणकर करत आहेत. या कार्यक्रमाचा पुढील प्रयोग शनिवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे. अनेक मान्यवर सेलिब्रिटींनी कौतुक केलेल्या या प्रयोगाला सर्व रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी विनंती निर्मात्या सौ. स्मिता हरी पाटणकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.