Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

" जर्नी " चा संगीत सोहळा संपन्न

 नात्यांचा प्रवास अधोरेखित करणाऱ्या  `जर्नी’चा संगीत सोहळा संपन्न

‘बघतो मी मला’ हे प्रेरणादायी शीर्षक गीत प्रदर्शित 


दिग्दर्शक सचिन जीवनराव दाभाडे यांचा `जर्नी`चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा संगीत सोहळा नुकताच पार पडला. या वेळी ‘बघतो मी मला’ हे प्रेरणादायी शीर्षक गीत प्रदर्शित करण्यात आले. जावेद अली आणि जयेश खरे यांच्या आवाजातील हे श्रवणीय गाणे आयुष्याचा प्रवास अधोरेखित करणारे आहे. विशाल कांबळे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला संगीतही त्यांचेच लाभले आहे. 



‘जर्नी’बद्दल दिग्दर्शक सचिन जीवनराव दाभाडे म्हणतात, ‘’ हा एक बालचित्रपट असला तरी कुटुंबातील प्रत्येकाने पाहावा असा हा चित्रपट आहे. ‘जर्नी’चे टायटल साँग हे अतिशय आशादायी आहे. यातील प्रत्येक कडव्यात जीवनाचा भावार्थ दडला आहे. हरवलेल्या एका मुलाची ही गोष्ट आहे. या काळात त्याला, त्याच्या आई -बाबांना अनेक अनुभव येतात, नात्यांचा अर्थ उमगतो, काही गोष्टींची जाणीव होते. हा जो प्रवास आहे तो ‘जर्नी’ आहे. यात प्रत्येक क्षणी प्रेक्षकांची उत्कंठा वाढणार आहे. चित्रपटात अनेकांकडून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. बरीच गुंतागुंत आहे आणि हा गुंता कसा सुटणार, हे पाहाण्यासाठी तुम्हाला ‘जर्नी’ चित्रपटगृहात पाहावा लागेल.’’



सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत, सचिन जीवनराव दाभाडे निर्मित या चित्रपटात शंतनु मोघे, शर्वरी जेमेनिस, शुभम मोरे, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, माही बुटाला, निखिल राठोड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सचिन दाभाडे यांची कथा असणाऱ्या या चित्रपटाचे लेखन रविंद्र मठाधिकारी यांनी केले आहे. तर भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड, अनिकेत अरविंद बुटाला या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.