मनोरंजनाची आतषबाजी, ग्लॅमरचा तडका… ढिंचॅक दिवाळी साजरी करणार आपला स्टार प्रवाह परिवार लाडका
October 31, 2023
0
मनोरंजनाची आतषबाजी, ग्लॅमरचा तडका…
ढिंचॅक दिवाळी साजरी करणार आपला स्टार प्रवाह परिवार लाडका
लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळून टाकणारा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आहे. आपल्या प्रत्येकाच्याच घरी दिवाळीची जय्यत तयारी सुरु झाली असेल. सणांची मजा तेव्हा द्विगुणीत होते जेव्हा संपूर्ण परिवार एकत्र येतो. यंदा स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार एकत्र येऊन ढिंचॅक दिवाळी साजरी करणार आहे. फराळा इतकाच खमंग कॉमेडीचा तडका आणि फटाक्यांच्या आतषबाजीप्रमाणे लखलखते कलाकारांचे परफॉर्मन्स यंदाची दिवाळी आणखी स्पेशल करणार आहेत.
स्टार प्रवाहच्या सर्वच मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. ढिंचॅक दिवाळीच्या निमित्ताने तुमच्या आवडत्या पात्रांचा आजवर न पाहिलेला अंदाज पाहायला मिळेल. तुमच्या आवडत्या जोड्यांच्या रोमॅण्टिक अंदाजासोबतच, खलानायिकांच्या दिलखेचक अदा यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने ढिंचॅक करतील. धमाकेदार परफॉर्मन्सेससोबतच सिद्धार्थ जाधव, हर्षदा खानविलकर विशाखा सुभेदार आणि रेश्मा शिंदे यांच्या खुमासदार सुत्रसंचलनाने या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली आहे. मोगराभाईच्या रुपात मंचावर अवतरलेल्या सिद्धार्थ जाधवने मंचावर अक्षरश: धिंगाणा घातला आहे.
तेव्हा पाहायला विसरु नका स्टार प्रवाह परिवाराची ढिंचॅक दिवाळी ५ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.




