सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांचा ७५वा वाढदिवस संपन्न
October 20, 2023
0
मराठी आणि हिंदीतही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिध्दी पावलेले सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांचा नुकताच 75 वा वाढदिवस थाटामाटात मात्र साध्या पद्धतीने पार पडला . या वाढदिवसाला अनेक कलाकार आणि प्रदीप यांच्या कौटुंबिक स्नेही असलेल्यांनी उपस्थिती लावली .
प्रदीप यांनी अनेक नाटक, चित्रपट व मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. एका नामवंत सरकारी संस्थेत मध्ये नोकरी करत असताना सुद्धा त्यांना अभिनयाची प्रचंड आवड स्वस्थ बसू देत नव्हती . त्यामुळेच नोकरी नंतर ते अनेकदा विविध नाटक व एकांकिका करत राहिले होते . वेळ नसताना सुध्दा वेळेचे नियोजन करीत नोकरी आणि आवड यांचे गणित त्यांनी जुळवले .
काही जवळच्या मित्र परिवार यांच्या सांगण्यानुसार नंतर प्रदीप यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःला पूर्णपणे झोकून घेतले. मराठी मनोरंजन क्षेत्रा मध्येही आपले मुख्य प्रोफेशन वर पाणी सोडून आपल्या आवड आणि एकूणच छंद जोपासता अभिनय क्षेत्रात अनेकांनी धाव घेतल्याची उदाहरण आहे .
‘बॅरिस्टर’ या नाटकामधून प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी अनेक नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर, हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. प्रदीप वेलणकर हे गेल्या दीर्घ कालावधी पासून अभिनय क्षेत्रात आहेत , त्यांनी साकारलेल्या विविध छोट्या मोठ्या भूमिकांना प्रेक्षकांचे अलोट प्रेम मिळाले आहे .
वाढदिवस सोहळ्याला प्रदीप यांच्या पत्नी व अभिनेत्री रजनी वेलणकर, मुली मीरा व मधुरा वेलणकर, जावई अभिजित साटम व कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. तसेच, ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, अशोक सराफ, अभिनेत्री वंदना गुप्ते, ईला भाटे, चिन्मयी सुमित यांसारख्या अनेक कलाकार मंडळींनी देखील या सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली
.
प्रदीप वेलणकर यांनी ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘असंभव’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘जिवाची होतिया काहिली’ यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर ‘चकवा’, ‘रॉकी’, ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटांसह ‘सिंघम’, ‘पेज थ्री’ या हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.