जागरण फिल्म फेस्टिवल 2023 मध्ये भारतीय सिनेमा क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींचा सन्मान,
October 19, 2023
0
जागरण फिल्म फेस्टिवल 2023 मध्ये भारतीय सिनेमा क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींचा सन्मान,
राणी मुखर्जी, अनुपम खेर, अदिल हुसैन आणि शोमॅन सुभाष घई या नामवंतांचा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरव
· जयराज कोझीकोड यांना ‘जननम – 1947 प्राणायाम थुडारुन्नु’साठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार, तर मनोज वाजपेयी यांना ओटीटी विभागातील सर्वोत्तम पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार
नुकत्याच संपन्न झालेल्या जागरण फिल्म फेस्टिवल 2023 पुरस्कार सोहळ्यासाठी भारतीय सिनेमा क्षेत्रातील नामवंतांनी हजेरी लावली होती. भारतीय सिनेउद्योगातील प्रसिद्ध कलाकारांच्या हजेरीने हा सोहळा नेत्रदीपक ठरला.
शोमॅन सुभाष घई यांनी सिनेमा क्षेत्राला दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांचा आयकॉन ऑफ इंडियन सिनेमा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार मनीष मुद्रा यांना ‘सिया’ या सिनेमासाठी देण्यात आला, तर सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार राणी मुखर्जी यांना ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’साठी आणि जयराज कोझीकोड यांना ‘जननम – 1947 प्राणायाम थुडारुन्नु’साठी देण्यात आला. मनोज वाजपेयी यांना ओटीटी विभागातील सर्वोत्तम पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला, तर अनुपम खेर यांना लोकप्रिय पसंतीतून अॅक्टर ऑफ द फेस्टिवल 2023 म्हणून घोषित करण्यात आले. अदिल हुसैन आणि नथालिया यांना प्रेक्षकांच्या पसंतीद्वारे ‘इंटरनॅशनल फुट प्रिंट्स ऑन वॉटर’ या सन्मानाने गौरवण्यात आले.
भारतीय विभागात “सिया” या सिनेमाला सर्वोत्तम फीरच फिल्मचा पुरस्कार देण्यात आला, तर ‘ट्रॅव्हल्स इनसाइड फॉरिन हेड्स’ला आंतरराष्ट्रीय विभागातील सर्वोत्तम फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. त्याशिवाय तिकडम, लवास्ते आणि चिडियाखाना या सिनेमांचा अतुलनीय योगदान दिल्याबद्दल विशेष उल्लेख करण्यात आला.
जागणरण प्रकाशन लि.च्या ब्रँड धोरण आणि व्यवसाय विकास विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. बसंत राठोड यांनी जागरण फिल्म फेस्टिवलची तीव्र लोकप्रियता अधोरेखित करत हा फेस्टिवल दरवर्षी अनोख्या व लोकप्रिय सिनेमांच्या सादरीकरणातून सिनेमाप्रेमींना आनंद देत असल्याचे सांगितले. सर्वोत्तम सिनेमांची निवड करणाऱ्या परीक्षक मंडळाप्रती कृतज्ञता व्यक्त करत फेस्टिवलमुळे उदयोन्मुख गुणवत्ता आणि विचारांना चालना देणारे सिनेमे यांच्यासाठी व्यासपीठ मिळत असल्याचे ते म्हणाले. फेस्टिवलचे हे अकरावे वर्ष असून भारतातील मोठ्या तसेच लहान शहरांत सिनेमा संस्कृती रूजवण्यासाठी आणि तळागाळातही सिनेमाच्या कलेप्रती कौतुक निर्माण करण्यात फेस्टिवल गेल्या दशकभरापासून कार्यरत असल्याकडे श्री. राठोड यांनी लक्ष वेधले.
3 ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या उद्घाटनानंतर जागरण फेस्टिवलने कानपूर, लखनौ, अलाहाबाद, वाराणसी, डेहराडून, हिसार, लुधियाना, पटना, रांची, लखनौ, गोरखपूर, रायपूर, इंदौर येथे प्रवास केला. 15 ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या जागरण फिल्म फेस्टिवल 2023 नंतर या फेस्टिवलची सांगता करण्यात आली.




