ZEE5 ने बहुप्रतिक्षित दुरंगा या यशस्वी भावनाप्रधान रोमांचक (रोमँटिक थ्रिलर) मालिकेच्या उत्तरभागाचा (सिक्वेलचा) फर्स्ट लूक रिलीज केला
~ रोहन सिप्पी ने दिग्दर्शन केलेल्या या दुसऱ्या सीझनमध्ये अमित साध आणि गुलशन देवैया यांच्या व्यक्तिरेखा समोरासमोर येताना पहायला मिळणार आहेत ~
आता वाट पाहणे संपले आहे! भारतातील सर्वात मोठा घरगुती व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि बहुभाषीय कथाकार ZEE5 ने मोशन पोस्टरचा उपयोग करून खूप प्रतीक्षेत असलेल्या 'दुरंगा' मालिकेच्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली. 'फ्लॉवर ऑफ इव्हिल' या कोरियन शोचे अधिकृत रूपांतर असलेली दुरंगा एस1 एक अतिशय आवडती भावनाप्रधान रोमांचक (रोमँटिक थ्रिलर) मालिका बनली होती. यात सततची वळणे दाखविली होती आणि त्यामुळे प्रेक्षक स्क्रीनला खिळवून बसले होते. गुलशन देवैया, दृष्टी धामी, बरखा सेन गुप्ता, राजेश खट्टर आता दुसऱ्या सीझनमध्ये आपापल्या भूमिकेत दिसणार असून त्यात अमित साध महत्वाची प्रमुख भूमिका साकारणार आहे.
याची निर्मिती गोल्डी बहलच्या रोज ऑडिओ व्हिज्युअल्स ने केली असून रोहन सिप्पीने याचे दिग्दर्शन केलेले आहे व दुरंगा एस2 मध्ये खरा सम्मित पटेल (अमित साध ने भूमिका साकारली आहे) कोमामधून उठून सम्मित पटेल म्हणून जगणाऱ्या अभिषेक बनेचा (गुलशन देवैया ने भूमिका साकारली आहे) पिच्छा पुरवताना पहायला मिळणार आहे. अमित साध एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे आणि तो त्यात आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी सर्वस्व पणाला लावण्याचे आव्हान गुलशन देवैयाला देत आहे. या सीझनमध्ये या तीन मध्यवर्ती पात्रांची उद्दिष्टे भिडताना दिसणार असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता तानणार आहेत.
मनीष कालरा, चीफ बिझनेस ऑफिसर, ZEE5 इंडिया म्हणाले, "दुरंगा सीझन 1 आमच्या प्रेक्षकांना आणि समीक्षकांना खूप आवडला आणि त्यांच्याकडून सीझन 1 चे समप्रमाणात कौतुक सुद्धा झाले. लोकांच्या मागणीमुळे दुरंगाचा अजून एक सीझन परत प्रस्तुत करताना आम्हाला आनंद होत आहे; आणि यावेळी, अधिक प्रमाणात रोमांच, अनेक वळणे मिसळलेली असून हे सुनिश्चित केले गेले आहे की आपल्याला एक आकर्षक आणि भावनाप्रधान रोमांचक (रोमँटिक थ्रिलर) पहायला मिळेल. आमच्या प्रेक्षकांसाठी आणखी एक अव्वल दर्जाचा रोमांचक (थ्रिलर) प्रस्तुत करण्याची उत्कंठा आम्हाला लागलेली आहे."
निमिषा पांडे, चीफ कंटेंट ऑफिसर - हिंदी ओरिजिनल्स, ZEE5 म्हणाल्या, "दुरंगाच्या पहिल्या सीझनच्या जबरदस्त यशानंतर आम्हाला या मनोरंजक भावनाप्रधान रोमांचकचा उत्तरभाग (रोमँटिक थ्रिलरचा सिक्वेल) सादर करताना आनंद होत आहे. आगामी सीझनमध्ये थरार वाढतो आणि नातेसंबंध अधिक गुंतत जातात, कारण कथानक अनपेक्षित आणि मनोरंजक वळण घेत आहे. कोरियन नाटकाचे पहिले भारतीय रूपांतर म्हणून प्रेक्षकांनी गेल्या वर्षी या फ्रँचायझीला भरभरून प्रेम दिले होते. गोल्डी बहल, रोहन सिप्पी आणि लेखक चारुदत्त यांनी उत्तरभागासाठी (सिक्वेलसाठी) एक मनोरंजक कथा तयार केली आहे आणि आम्ही आशा करतो की ही जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन करेल."
निर्माते गोल्डी बहल म्हणाले, 'दुरंगाच्या पहिल्या सीझनला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी आभार मानतो. सीझन 2 साठी मला जास्त प्रमाणात उत्सुकता लागलेली आहे कारण तो अधिक स्पष्ट (शार्प), भक्कम असून त्यात अधिक वळणे दाखविली गेली आहेत. सीझन 1 चा शेवट एका क्लिफहॅंगरवर झाला जिथे आपल्याला अमित साधची व्यक्तिरेखा कोमामधून बाहेर येताना दिसली. सिझन 2 मध्ये त्याहून अधिक गुंतागुंत असून तो मनोरंजक पद्धतीने तिथून पुढे सुरू होतो. रोहन सिप्पी, दृष्टी धामी, गुलशन देवैया आणि अमित साध यांच्यासोबत काम करताना खूप आनंद झाला. हे सर्व जण आपापल्या कलेत हुशार आहेत. झी 5 आणि निमिषा पांडे यांच्यासोबत उत्तम पद्धतीने काम करता आले आणि म्हणून त्यांचे मनःपूर्वक आभार. प्रेक्षकांनी या सीझनचा आस्वाद घेण्याची मला आतुरता लागली आहे.'
दिग्दर्शक रोहन सिप्पी म्हणाले, 'दुरंगासारख्या यशस्वी फ्रँचायझीला पुढे नेण्यासाठी मला पुन्हा एकदा रोज आणि ZEE5 सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि त्याबाबतीत माझ्याकडून त्यांना खूप खूप आभार. कलाकार व क्रू यांनी यावेळी अधिक उत्साह दाखविला आहे आणि त्यांनी त्यात भावनिक पद्धतीने भर घातला आहे आणि सर्व विभागांमध्ये खूप मेहनत घेतली आहे आणि म्हणून लवकरात लवकर तो प्रेक्षकांसमोर प्रस्तुत करण्याची आम्हाला उत्कंठा लागलेली आहे!".

