प्राइम व्हिडिओ ह्या भारतातील सर्वांत लोकप्रिय मनोरंजन स्थळाने आज त्यांच्या मुंबई डायरीज ह्या सर्वाधिक प्रतिक्षित मेडिकल ड्रामाचे ट्रेलर प्रदर्शित केले. पहिल्या सीझनमध्ये झालेल्या घटनांनंतर काही महिन्यांनी दुसऱ्या सीझनची सुरुवात होत आहे. बॉम्बे जनरल हॉस्पिटलचे कर्मचारी आता नवीन आव्हानांना तोंड देणार आहेत. मुसळधार पाऊस आणि त्यामुळे झालेल्या विध्वंसाचा सामना त्यांना करावा लागणार आहे. निखिल अडवानी ह्यांचे क्रिएशन व दिग्दर्शन असलेल्या ह्या मेडिकल ड्रामाची निर्मिती मोनिषा अडवानी व मधु भोजवानी ह्यांच्या एमे एण्टरटेन्मेंटने केली आहे. कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजीत दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी ही वैविध्यपूर्ण कलावंतांची फौज सीझन 2 मध्ये पुन्हा एकदा दिसणार आहे. शिवाय, परमब्रत चट्टोपाध्याय आणि रिद्धी डोग्रा हे कलावंत नव्याने सहभागी झाले आहेत. 6 ऑक्टोबर रोजी भारत आणि 240 देश-प्रदेशांमध्ये केवळ प्राइम व्हिडिओवर प्रदर्शनासाठी सज्ज असलेली मुंबई डायरीज सीझन टू प्राइमच्या संग्रहातील नवीन भर आहे. भारतातील प्राइम सदस्य बचत, सोय आणि मनोरंजनाचा अनुभव केवळ वार्षिक ₹ 1,499मध्ये घेऊ शकतात.
हा सीझन थरारक असेल ह्याची ग्वाही ट्रेलरवरून मिळते. मुंबई शहराला बुडवून टाकू शकेल अशा विध्वंसक पुराच्या विषयामुळे कथेचा थरार वाढला आहे. बॉम्बे जनरल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा वैयक्तिक समस्या बाजूला ठेवून शहर वाचवण्यासाठी काम करण्याची गरज भासत आहे. त्यातील काही समस्या त्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या, त्यांचे नातेसंबंध आणि भवितव्य उद्ध्वस्त करणाऱ्या आहेत. त्यांना भूतकाळातील गोष्टींशी आणि वर्तमान परिस्थितीशी झगडून तरावे लागणार आहे आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावाले लागणार आहे.
“मुंबई डायरीजच्या दुसऱ्या सीझनबद्दल मी अत्यंत उत्साही आहे. हा प्रवास आत्तापर्यंत लक्षणीय राहिला आहे आणि ह्या सीझनमध्ये प्रेक्षकांना डॉ. कौशिकची दुसरी बाजू बघायला मिळेल असे मला वाटते. पहिल्या सीझनमध्ये आमच्या व्यक्तिरेखांचा व रुग्णालयाच्या आयामाचा पाया घातला गेला आणि आता दुसऱ्या सीझनमध्ये आम्ही आमच्या व्यक्तिरेखांच्या व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्यांमध्ये अधिक खोलवर जाणार आहोत,” असे अभिनेता मोहित रैना म्हणाला. “वैद्यकीय केसेस अधिक जटील आहेत, नातेसंबंध अधिक उत्कट आहेत आणि पुराने घडवलेल्या विध्वंसामुळे नाट्य एका वेगळ्या स्तरावर गेले आहे. निखिल आणि एमे व प्राइम व्हिडिओच्या टीम्स ह्यांनी मिळून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा शो तयार केला आहे. जगभरातील प्रेक्षक कधी एकदा आमच्यासोबत हा प्रवास सुरू करतात असे मला झाले आहे.”