Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

" आपण यांना पाहिलत का ? " धमाल नाटक लवकरच रंगभूमीवर

वरदा आणि वैध निर्मित, प्रवेश प्रकाशित, विजय केंकरे दिग्दर्शित 'आपण यांना पाहिलंत का?' नवंकोरं नाटक लवकरच रंगभूमीवर


*'आपण यांना पाहिलंत का?' धमाल नाटक  लवकरच रंगभूमीवर*

ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दिग्दर्शनाची शंभरी पार केली आहे आणि आता 'आपण यांना पाहिलंत का?' हे नवं खुसखुशीत नाटक ते लवकरच रंगभूमीवर घेऊन येत आहे. 



या नाटकाची निर्मिती आदिती देवेंद्र राव, वैशाली धनेश पोतदार यांनी केली आहे. सुशील स्वामी यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. वैवाहिक आयुष्याची बरीच वर्षे सोबत काढल्यावर नवरा बायको  नकळतपणे एकमेकांना ग्राह्य धरू लागतात. ते सुखी तर असतात, पण त्यांच्या संसारात पोकळी नेहमी जाणवत राहत असते, ती पोकळी कोणी एक व्यक्ती भरून काढतं, ती व्यक्ती त्या जोडप्यांच्या संसारात कधी कधी दिसते, तर कधी नाही दिसत, पण त्यां व्यक्तीच्या असण्याने जो संसार कंटाळवाणा झालाले आहे तो अचनाकपणे ताजातवाना होतो. त्याच्या येण्याने जी काही गंमत संसारात होऊ शकते ती सर्व गंमत 'आपण यांना पाहिलंत का?' या नाटकामध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.



विजय केंकरे यांनी पती-पत्नीच्या नात्याचा वेध घेणारी अनेक नाटकं दिग्दर्शित केली आहेत. कसदार दिग्दर्शनातून नेमक्या पद्धतीनं आजच्या काळावर ते नाटकातून भाष्य करतात. त्यातच पती-पत्नी, नातेसंबंध हा विषय प्रत्येक काळात कालसुसंगत असतो. त्यामुळे 'आपण यांना पाहिलंत का?' या नाटकात आता काय धमाल अनुभवायला मिळणार याची उत्सुकता आहे.  



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.