Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मी बरेचदा क्वारंटाइन च असतो --- नाना पाटेकर

 मी बरेचदा "  क्वारंटाइन  " च असतो  --- नाना पाटेकर 



1978 ला " गमन " या नाटका द्वारे मनोरंजन क्षेत्रात पाय ठेवणाऱ्या पद्मश्री नाना पाटेकर यांनी सर जे जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्स मधून आपले उच्च  शिक्षण पूर्ण केले . पटकथा लेखन , अभिनेता ते निर्माता अशी मजल नाना यांनी मारत मराठी सह बॉलिवूड , एकंदरच सिने जगतात आपले एक आगळे वेगळे स्थान प्रस्थापित केले .

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिकणाऱ्या नाना यांनी नुकतीच " द वैक्सिन वॉर " फिल्म पूर्ण केली . त्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद.



माझ्याकडे फार्म हाऊस वर 5 श्वान , 12 गाय , 2 बैल आहेत . गावठी श्वान कोणालाही फार्म हाऊसमध्ये जवळ येऊ देत नाही , म्हणून भल्या मोठ्या फार्म हाऊस वर मी तसा बहुतेकदा क्वारंटाइन च असतो .

कोरोना काळ माझा अशा पद्धतीने एकांतवासात गेला . पण अनेकदा बाहेर जावेच लागले .

सुशांत सिंग चे निधन प्रसंगी नंतर बिहार ला गेलो होतो , कामा निमित्त कलकत्या ला गेलो होतो .


त्या काळात मला अनेकदा कोरोना होऊन गेला . मात्र मी माझ्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचे जोरावर कोरोना वर मात करीत गेलो . घरच्यांच्या आग्रह खातर , मल्हार चे सततचे सांगण्या मुळे 2 वेळा कोरोना वरील लस घेतली आहे .

चितपटा बद्दल बोलताना ,  मी " बलराम भार्गव "  यांची भूमिका केली . त्यांना त्यावेळी भेटलो नाही ,  ना संवाद साधला कारण नंतर मग मी जे आता नैसर्गिकपणे काम केले कदाचित तसे झाले नसते . मात्र मला जर अगोदर भेटले असते तर त्यांची विचार पद्धती , मनातील काही बाबी वैगेरे मी निरीक्षण केले असते . त्यांच्या चालणे - बोलणे वैगेरे यांच्या मध्ये मला तसा रस नव्हता .



जेव्हा आम्ही त्यांच्यासाठी चित्रपटाचा शो ठेवला होता , नंतर त्यांनी मला डोळ्यात भरून असलेल्या आसवांनी इशाऱ्याने विचारले की आपली भेट नसताना देखील तू हे सर्व काही कसे केलेस ?

साहजिकच हे सर्व माझ्या दिग्दर्शकाचे यश असून त्यांच्या निर्देशा नुसार मी सर्व काम केले आहे . 

मी माझ्याकडून नकळत पणे संवाद किंवा अन्य काही इनपुट नाही दिले कारण एकतर ही फिल्म बायो सायन्स वर आधारित असल्याने सर्वानाच दिग्दर्शक वर च अवलंबून राहावे लागत असे .

मात्र काही चांगल्या बाबी अनाहूतपणे घडून गेल्या , ते विवेक सह आम्हा सर्वानाच अनपेक्षित होत्या . नाना यांनी क्रिकेट चे आणि रंगभूमीवरील नाटका चे " प्रयोग " चे उदाहरण दिले . कलाकार हा रोजच शिकत असतो म्हणून नाटक करताना आम्ही " प्रयोग " शब्द वापरतो कारण रोजच नव्याने कलाकार शिकत असतो . काल तुम्ही पाचशे करोड रुपये कमावले मात्र आज पुन्हा नव्याने नवीन शिकायचे असते , ते जर जमले नाही तर मग ते पाचशे करोड रुपये हे एक अपघात होता असे बोलले जाईल .



अनुभवाने समृध्द असलेली व्यक्ती गुणसंपन्न कलाकार होऊ शकते . सुख दुःखाचा विचार केल्यावरही आपापली सुख दुःखे वेगळी असतात . गरिबांनी आत्महत्या केल्यावरही प्रसिध्दी माध्यमांच्या मुलाखती पेक्षा घरातील आधारवड गेला आणि संध्याकाळ चे दोन घासांची भ्रांत त्या कुटुंबाला सतावते आणि आपण मात्र जे सधन आहोत , आपल्याला कर्ता गेल्यावर संपत्तीच्या वाटणी ची चिंता असते , असे संवेदनशील उदाहरण नाना यांनी सहजगरित्या दिले .


मी माझ्या जुन्या फिल्म पुन्हा कधी बघत नाही , आता ही बघितली की पुन्हा नाही बघणार कारण पुन्हा नव्याने येणाऱ्या कलाकृती करायच्या असतात . ज्या फिल्म चांगल्या वाटतात त्या करतो , ज्या नाही त्या नाही करत , असे "  वेलकम 3 "  बद्दल नाना यांनी सांगितले . बहुधा मी नवीन प्रोजेक्ट साठी होकार देत नाही , " मीच का " ? असे मी समोरच्या व्यक्तीला विचारतो . मात्र वैकसीन वॉर साठी मात्र मी लगेच होकार दिला . " इंडिया कॅन डू इट " ने मी प्रभावित आहे .

आपल्या देशा विरोधात बोलणारे पण खूप जण आपल्यात आहेत .  इंडिया आणि भारत बद्दल बोलताना भारत हा भारतच आहे , वादाचे कारणच नाही ना !

जी बाब आहे ती आहे , जसे बॉम्बे चे मुंबई , मात्र गाण्यातील बॉम्बे तसेच आहे ना ! 

बदलत्या शहरीकरणामुळे नानांनी आपल्या भावना सांगताना , ही मुंबई माझी नाहीच , माझी मुंबई सन 52 ची . वृक्षवल्ली असलेली , विना जातीधर्माचे मुंबई ही होती . समाजात वाद नव्हते , एका घरात शिजलेले अन्न शेजारच्या घरात दिले जायचे , मात्र आज हे संपले सर्व . वादविवाद , खून खराबा, वैगेरे गोष्टी आज आहेत .

" नाम " संघटनेचे काम आता फार विस्तारले असून काश्मीर , गुवाहाटी , जयपूर येथे ही सुरू आहे . संघटनसाठी कार्य करणारे अनेक पुढे आल्याने तळागाळात काम होत आहे . 


चित्रपटसृष्टीतील झालेले बदल नानांना आवडत नाहीत . तीन शिफ्ट मध्ये चालणारे काम नको तर आठ तासांचे काम हवे , चित्रीकरण अगोदर वेळ हवा , स्क्रिप्ट हवी , रात्री सीन लिहून सकाळी शूटिंग साठी बोलावणारे अनेक आहेत .  स्क्रिप्ट मला हिंदीत लागते , इंग्रजी मला जमत नाही . भाषा मध्येही तुम्ही फरक कराल तर तुम्हाला भारतात राहण्याचा हक्क नाही , सर्वच बाबी मध्ये समानता हवी मग ती भाषा असेना . 


आगामी  प्रोजेक्ट बद्दल नानांचा एक मराठी चित्रपट आहे , एक " कन्फेशन "  नामक फिल्म आहे   की, जी अनंत महादेवन यांनी लिहिली आहे ,  प्रकाश झा यांची " संकल्प " वेब सिरीज आहे . ओ टी टी ने मला काही फरक नाही , सर्वत्र सारखेच काम , किरकोळ बदल असतो तेवढेच. 



इंडस्ट्रीतील मैत्री बद्दल सांगताना नानांनी ऋषी कपूर , मिथुन , Danny Denzappa  आदींची नावे घेतली . ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या काही आठवणींना उजळा दिला . एकदा  ऋषी आणि नीतू यांच्यासाठी खास चिकन बनविण्याचा  किस्सा सांगून ऋषी यांच्या अनेक आठवणी जागवल्या . 


हाणामारीच्या फिल्म मी नाही करत आहे आता . वैज्ञानिक यांच्या कर्तुत्वावर फिल्म निघते ही चांगली बाब आहे , विवेक ची ही वैकसिन वॉर ही  फिल्म आहे , तो विषयावर फिल्म निघू शकते असे वाटत नाही पण त्यांनी सखोल , साधक बाधक रित्या फिल्म बनवली . तुम्ही बघणार तर सर्वांनी बघायला तुम्ही प्रवूत्त करणार . फिल्म ने किती धंदा केला , हे महत्त्वाचे नाही तर अशा विषयावर फिल्म निघणे मोठी बाब आहे . 


कोरोना लस चे बाबतीत जागतिक पातळीवर विविध बाबी घडल्या , जागतिक आरोग्य संघटना आपल्या निर्मित केलेल्या लस ला मान्यता द्यायला तयार नव्हती.  भारतीय लस ही सर्वमान्य झाली , आफ्रिकन देशांना आपण खूप पुरवठा केला . लस चे उदाहरण घ्या की , आपल्याकडे विद्वत्ता खूप आहे , त्याचा योग्य जागी वापर व्हायला हवा . 

योग्य गोष्टीचा योग्य जागी वापर व्हायला हवा , जसे धान्याचा वापर खाद्य म्हणून होतो मात्र त्यापासून मद्य ही बनवले जाते म्हणून योग्य वापर महत्त्वाचे आहे . 

कंटेंट बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की मी काही दिवसापूर्वी जी फिल्म बघितली त्यात प्रचंड हिंसाचार दाखवला , करोडो रुपये कमावले मात्र त्याचा मुलांवर , समाजावर तसाच परिणाम होणार ना ! वेल कम बद्दल चे यश हे अनिस बजमी चे यश असून मी आणि अनिल निमित्त होतो असेही नानांनी नमूद केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.