Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सयाजी शिंदे यांचा " आधारवड " चित्रपट " अल्ट्रा झकास " मराठी ओ टी टी वर

सयाजी शिंदे यांच्या 'आधारवड' चित्रपटाचं वर्ल्ड डिजिटल प्रीमियर 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर


मुंबई : जीवनाला कलाटणी देणाऱ्या ‘आधारवड’ चित्रपटाचा २ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. सुरेश शंकर झाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटात सयाजी शिंदे, शक्ती कपूर, राखी सावंत,  रोहित हंचाटे आणि अतुल परचुरे हे नामवंत कलाकार दिसणार आहेत. 


चित्रपटाची कथा श्रवण आणि त्याच्या प्रतिभावंत आयुष्याभोवती फिरते. श्रवणच्या आयुष्यात घडलेली एक भावनाविवश करणारी घटना त्याच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देऊन जाते. श्रवणचा जीवनप्रवास प्रत्येकासाठी एक प्रेरणा असून विचार करायला लावणारा आहे. 


“आजच्या तरुणांना आपल्या पालकांचे महत्त्व सांगण्यासाठी आणि आपल्या पालकांप्रती आदर कमी होऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी ‘आधारवड’ हा चित्रपट आजच्या तरुण वर्गाने आवर्जून पाहायला हवं.” असे अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.इ.ओ. श्री सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.



अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या. जीवनाला कलाटणी देणाऱ्या वास्तवदर्शी भावनाविवश कथा सांगणाऱ्या ‘आधारवड’ चित्रपटासोबतच झकास मनोरंजन, सदाबहार एकापेक्षा एक कौटुंबिक कथा, विनोदासह जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपटांतील ड्रामा अनुभवण्यासाठी लगेच डाउनलोड करा 'अल्ट्रा झकास ओटीटी' ॲप आणि तुमच्या कुटुंबासोबत अमर्याद आनंद घ्या अल्ट्रा झकास वरील एचडी कन्टेंटचा.

*App link:*

 https://ultrajhakaas.app.link

* जीवनाला कलाटणी देणाऱ्या ‘आधारवड’ चित्रपटाचे प्रोमो पाहण्यासाठी लिंक*

https://www.facebook.com/UltraJhakaas

https://www.instagram.com/ultrajhakaas

https://www.youtube.com/@ultrajhakaas

https://twitter.com/ultrajhakaas


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.