Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

" आत्म्पॅमफ्लेट " ला एशिया पॅसिफिक यंग ऑडियंस अवॉर्ड

 'आत्मपॅम्फ्लेट' चित्रपटाला 'एशिया पॅसिफिक यंग ऑडियन्स अवॉर्ड' 

७०हून अधिक देशांतील चित्रपटांमधून निवड 


एशिया पॅसिफिक स्क्रीन अकॅडमी अँड ऑस्ट्रेलियन टिचर्स ऑफ मीडिया क्विन्सलँड येथे आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित 'आत्मपॅम्फ्लेट' या चित्रपटाला 'एशिया पॅसिफिक यंग ऑडियन्स अवॉर्ड'ने गौरवण्यात आले आहे. ऑस्टेलिया येथे आयोजिलेल्या या चित्रपट महोत्सवात सुमारे ७० हून अधिक देशांनी सहभाग घेतला होता. त्यातून तीन चित्रपटांची निवड झाली असून त्यात इंडोनेशियन, मलेशियन आणि 'आत्मपॅम्फ्लेट' या भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. यापूर्वी 'आत्मपॅम्फ्लेट'ची ७३ वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही निवड झाली होती. अत्यंत तिरकस विनोदी, आणि  मनोरंजक कथा असणाऱ्या या चित्रपटाचे लेखन परेश मोकाशी यांनी केले असून यात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गुलशन कुमार, टी सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित हा निखळ आनंद देणारा चित्रपट येत्या ६ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज  'आत्मपॅम्फ्लेट'चे निर्माते आहेत. 



काही दिवसांपूर्वीच 'आत्मपॅम्फ्लेट'चे जबरदस्त टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. टिझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच आता या चित्रपटाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. या यशाबद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेंडे म्हणतात, '' ७०हून अधिक देशांमधून जे तीन चित्रपट निवडले त्यात 'आत्मपॅम्फ्लेट'ची निवड होणे, ही निश्चितच आनंददायी बाब आहे. हे यश पडद्यावर दिसणाऱ्या आणि पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाचे आहे. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन सह चार विविध ठिकाणी या चित्रपटांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यावेळी तिथल्या ज्युरी विद्यार्थ्यांनी हे तिन्ही चित्रपट बघितले. तिन्ही चित्रपटांच्या दिग्दर्शकांसोबत व्हिडीओ कॉल वर प्रश्नोत्तरे केली, चर्चा केली त्यानंतरच हा अवॉर्ड देण्यात आला. परदेशी प्रेक्षकांनाही आपला अस्सल मराठी चित्रपट आवडतोय, ही भावनाच खूप सुखावह आहे. सर्व वयोगटाला आवडेल, असा हा चित्रपट आहे. प्रत्येकाला ही आपलीच गोष्ट आहे असे वाटेल. ''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.