Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

झी5 इंटेलिजन्स मॉनिटरने सादर केला नवीन अहवाल

 झी5 इंटेलिजन्स मॉनिटरने सादर केला नवीन अहवाल

उद्योग आणि व्यवसायांसाठी क्विक डिलिव्हरी सर्विसेस (QDS) संदर्भातील अहवाल मार्गदर्शक ठरणार

 

 झी5 हा भारतातील सर्वात मोठा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असून मनोरंजनाची ओढ असणाऱ्यांसाठी विविध भाषांमध्ये विविध कहानी सादर करतो. झी5ने आपल्या इंटेलिजन्स मॉनिटरचा क्विक डिलिव्हरी सर्विसेससंदर्भात नवा अहवाल सादर केला असून त्यातून अनेक ट्रेंड समोर येत आहेत. या सर्वसमावेशक संशोधन अहवालानुसार क्विक डिलिव्हरी सर्विसेस प्स ग्राहकांसाठी क्रांतिकारी बदलाचे साधन ठरत आहे. शिवाय मेट्रो आणि नॉन मेट्रो क्षेत्रांमध्ये वस्तू आणि सेवा खरेदीसाठी नवा ट्रेंडही तयार होत असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय महिलांमध्ये क्विक डिलिव्हरी सर्विसेस प्सची मागणी वाढल्याचे दिसून आले आहे.





झी5च्या इंटेलिजन्स मॉनिटरने उद्योग आणि व्यवसायांसाठी क्विक डिलिव्हरी सर्विसेस संदर्भात तयार केलेला हा अहवाल मार्गदर्शक ठरणार आहे. त्यांना आपला ग्राहक कोण आहे, हे ठरवून त्याप्रमाणे काम करता येणार आहे. QDS apps च्या मेट्रो युजर्सशी बिगर मेट्रो युझर्सची तुलना केल्यास त्याचे प्रमाण 53:47 असे दिसून आले. पँडेमिक काळानंतर यात मोठा बदल झाल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक ग्राहक हा प्रत्येक युजरसारखा असल्याची मागणी वाढत असल्याचे QDS इकोसिस्टीमवर दिसून येते.





राजीव बक्षी, महसूल विभाग-मुख्य कार्यन्वयन अधिकारी, झी इंटरटेनमेंट इंटरप्राईजेस लिमिटेड यांनी सांगितले की, ''घरपोच सेवा मिळणे ही या QDS प्सची सर्वात जमेची बाजू आहे, पण विश्वास आणि गोपनीयता या दोन गोष्टीही महत्त्वाची भूमिका पार पडतात. महिलांसाठी हे वेळ वाचवण्याचे साधन आहे. देशपातळीवर QDS प्सचा वापर वाढू लागला आहे. खास करून बिगर मेट्रो युजर्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. झी5 इंटेलिजन्स मॉनिटर क्विक डिलिव्हरी सर्विसेस हा ट्रेंड दर्शवणारा सर्वात मोठा अहवाल आहे. त्यातून युजर्सची खरेदीची सवय कशी बदलत आहे हे कळते आणि ग्राहकांसाठी कुठल्या धोरणांनुसार पुढे जावे याचा विचार करायला लावणारे संशोधनही यात आहे. QDS प्स महिलांना सशक्त तर करतातच शिवाय व्यवसायांनाही भविष्यातील नवनव्या संधींची हमीही देतात. हा अहवाल सखोल माहिती देतो, त्यामुळे QDS सेवा देणाऱ्या व्यवसायांना आपली मूल्यांमध्ये वृद्धी करण्याची संधी निर्माण करून देतो.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.