Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

" शांतीत क्रांती - 2 " चा ट्रेलर रिलीज

 सर्वात लोकप्रिय त्रिकूट - प्रसन्‍न, दिनार व श्रेयस यांचे 'शांतीत क्रांती सीझन २'सह पुनरागमन: ट्रेलर रीलीज करण्‍यात आला आहे!


पहिल्‍या सीझनला भव्‍य यश मिळाल्‍यानंतर सोनी लिव्‍ह समीक्षकांनी प्रशंसा केलेली त्‍यांची मराठी ओरिजिनल 'शांतीत क्रांती'चा दुसरा सीझन सादर करण्‍यास सज्‍ज आहे. सीझन २ हास्‍याचा दुहेरी डोस देण्‍याची खात्री देतो आणि आत्‍म-शोधाच्‍या उत्‍साहाला जागृत करतो. १८ महिन्‍यांनंतर एकत्र येत श्रेयस (अभय महाजन) सर्व मुलांना विवाह करत असल्‍याची आनंदाची बातमी देतो आणि तिन्‍ही मुले श्रेयसच्‍या इंटरनॅशनल बॅचलर ट्रिपवर जाण्‍याचे ठरवतात. श्रेयसचा साखरपुडा झालेला नाही, प्रसन्‍नने (‍ललित प्रभाकर) त्‍याच्‍या बाळाला सोबत आणले आहे आणि दिनारने (अलोक राजवडे) बॅचलरच्‍या ट्रिपऐवजी १० अनोळखी व्‍यक्‍तींसह नेपाळला ६ दिवसांच्‍या तीर्थयात्रेवर जाण्‍यासाठी बस बुक केली आहे हे समजल्‍यानंतर स्थिती वेगळे वळण घेते.


ललित प्रभाकर म्‍हणाला, ''शांतीत क्रांती सीझन १ ला प्रेक्षकांकडून भरघोस प्रेम मिळाले. आम्‍हाला नवीन सीझनसह पुनरागमन करण्‍याचा आनंद होत आहे, जेथे आम्‍ही उलगडे, हास्‍य, ट्विस्‍ट्स, रोमांचने भरलेल्‍या नवीन प्रवासाची सुरूवात करत आहोत. हा सीझन नात्‍यांना पुनर्परिभाषित करतो, तसेच नवीन पात्रांना सादर करतो, जे आमच्‍यापैकी प्रत्‍येकाला पुढे जाण्‍यास मदत करतात. आम्‍ही आशा करतो की, हा सीझन प्रेक्षकांचे मनोरंजन करेल आणि त्‍यांच्‍याशी संलग्‍न होईल.''



भडिपासह सहयोगाने टीव्‍हीएफची निर्मिती आणि अरूनभ कुमारद्वारे निर्मित शोचे दिग्‍दर्शन सारंग साठ्ये व पौला मॅकग्‍लीन यांनी केले आहे. या सिरीजमध्‍ये अभय महाजन, आलोक राजवडे, ललित प्रभाकर, मृण्‍मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी, प्रियदर्शिनी इंदलकर हे स्‍टार कलाकार आहेत.


Link: https://www.youtube.com/watch?v=pKSU6gHUeRE


*'शांतीत क्रांती २'चे स्ट्रिमिंग पहा ऑक्टोंबर १३ फक्‍त सोनी लिव्‍हवर!*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.