श्रीदेवी प्रसन्न हया ताज्या मसालेदार रोमेंटिक सिनेमातून 'टिप्स फिल्मस ' मराठी चित्रसृष्टीत पदार्पण करत आहे. अनेक सिनियर अभिनेत्यांच्या अदाकारीने रंगलेल्या ह्या सिनेमात प्रमुख भूमिकेत साई ताम्हणकर अणि सिद्धार्थ चांदेकर आहेत.
बॉलीवुडमधल्या अनेक यशस्वी मनोरंजक फिल्मच्या अभुभवांचं पाठबळ सोबत घेऊन मराठी चित्रसृष्टीत दाखल होण्यसाठी टिप्स उत्सुक आहे.
हया चित्रपटाचं लिखाण केलं आहे 'कॉफी अणि बरंच काही' अणि 'सायकल' चित्रपठ लिहिलेल्या अदिती मोघे हिने अणि ते विश्व आपल्या रिफ्रेशिंग ट्रीटमेंट ने जिवंत केलं आहे नव्या दमाचा दिग्दर्शक विशाल मोढवे ह्याने.
मराठी सिनेमाची नाळ जाणून, त्यातली विविधता लक्षात घेऊन इंटरेस्टिंग गोष्टींना platform देण्याच्या क्रिएटिव प्रोड्यूसरच्या रोलमध्ये नेहा शिंदे अणि अविनाश चाटे आहेत.
श्रीदेवी प्रसन्न हा हलका फुलका सिनेमा ५ जनवरी २०२४ पासून प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे
