Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जर्मनी मध्ये सॅमसंग टिव्ही प्लस वर घेता येणार बॉलिवूडच्या झी - 1 मनोरंजनाची मजा

 जर्मनीमध्ये सॅमसंग टीव्ही प्लसवर घेता येणार बॉलीवूडच्या झी-वन मनोरंजनाची मजा


जर्मनी, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियामध्ये सॅमसंग टीव्ही प्लसच्या माध्यमातून झी-वन चॅनेल पुन्हा येणार टीव्ही स्क्रिनवर


 - बॉलीवूड आणि भारतीय टीव्हीवरील विषयांची मागण लक्षात घेऊन झी इंटरटेन्मेंट इंटरप्रायझेस लिमिटेडेने (ZEEL) सॅमसंग टीव्ही प्लसशी भागीदारी करून जर्मनीतील दर्शकांसाठी झी वन हे बॉलीवूड केंद्रीत चॅनेल पुन्हा सुरू सुरू करत असल्याची घोषणा केली. यामुळे दर्शकांना सॅमसंग टीव्ही प्लसवर चॅनेलवरील मनोरंजनाचा अविरत आनंद लुटता येणार आहे. हॅप्पी न्यू ईयर, परदेस, रुस्तुम, शमिताभ आणि अशा अनेक हजारो तासांचे बॉलिवूड चित्रपटांचा आनंद यावर दर्शकांना घेता येईल. याशिवाय, जमाई राजा, कुंडली भाग्य आणि जोधा अकबर या भारतीय टीव्हीवर गाजलेल्या मालिका जर्मन भाषेत भाषांतरीत करून दाखवल्या जाणार आहेत. बॉलीवूडमधील उच्च दर्जाचे मनोरंजन दर्शकांना देण्यासाठी झी वन कटिबद्ध आहे. जर्मन मार्केटसाठी झी वनचा प्रीमियम कंटेंट विशेषकरून निवडला आहे. या वेगवान चॅनेलवर पारखून घेतलेल्या मिश्र चित्रपटांचा आणि मालिका प्रसारित केल्या जाणार आहेत. शाहरूख खान, अनिल कपूर आणि दीपिका पडुकोन यांची चित्रपटेही दाखवली जाणार आहेत. रोमान्स, कॉमेडी, अॅक्शन आणि अशा सर्व प्रकारातले हे चित्रपट असतील.


श्री पुनित मिश्रा, अध्यक्ष, कंटेट-आंतरराष्ट्रीय मार्केट्स, झी इंटरटेन्मेंट इंटरप्रायझेस माहिती देताना सांगितले की,‘’सॅमसंग टीव्ही प्लससोबत जोडले जाण्याचा आम्हाला आनंद आहे. त्यातून जर्मनी, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियातील दर्शकांना भारतीय मनोरंजनाचा सुखद अनुभव घेता येणार आहे. झी ही जागतिक कंटेंट कंपनी असून १९० देशांमध्ये आहे. जगभरातील अब्जावधी लोकांचे मनोरंजन करते. या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही जगभरातील आघाडीच्या आणि स्पर्धात्मक कंटेंट मार्केटमध्ये सर्वोत्तम सेवा देण्यास कटिबद्ध आहोत.’’



अशोक नंबोदिरी, चीफ बिझनेस ऑफिसर-इंटरनॅशनल बिझनेस म्हणाले की,‘’झी वन हे केवळ एक चॅनेल नाही तर तो जर्मनी, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियाच्या दर्शकांना बॉलीवूड जगताशी जोडणारा सांस्कृतिक पूल आहे. सर्वोत्कृष्ट आणि खास कंटेंट देऊन दर्शकांना मनोरंजनाचा विशेष आनंद देणे हा आमचा उद्देश आहे. दक्षिण आशियायी भागातच नव्हे तर चॅनेल्सच्या माध्यमातून भारतीय भाषांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय दर्शकांसाठी त्यांच्या भाषेत कंटेट पोहोचवण्याचा आमचा दृष्टिकोन असून, सॅमसंग टीव्ही प्लससोबतची भागीदारी त्याच दृष्टिकोनातून आहे.’’


बेनेडिक्ट फ्रे, सॅमसंग टीव्ही प्लस कंट्री लीड म्हणाले की,‘’जर्मनी, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियामध्ये सॅमसंग टीव्ही प्लसमध्ये झी वनचा समावेश करताना आम्हाला आनंद होतो आहे. डच भागात आम्हाला बॉलीवूड केंद्रीत कंटेट पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आम्ही उत्साही आहोत. भारतीय भाषांमध्ये बॉलीवूड जगत नव्या दर्शकांपर्यंत पोहोचवणार आहोत.’’

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.