महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे गौरव मोरे प्रकाशझोतात आला. तो या कार्यक्रमापुरतीच मर्यादीत राहिला नाही. आता मराठी चित्रपटांमध्येही गौरव काम करताना दिसत आहे. दरम्यान गौरवच्या अभिनयासह त्याच्या हेअर स्टाइलची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसते.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये गौरव साकारत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात तो कायमच यशस्वी ठरतो. त्याची हेअरस्टाइल तर विशेष लक्षवेधी असते. तो जेव्हा मान डोलवत लांब केस हवेत उडवतो ते प्रेक्षकांना विशेष आवडतं. त्याची हेअरस्टाइलच त्याच्या प्रत्येक पात्राची खासियत असते.
‘आय एम गौरवर मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा’ हे वाक्य गौरवच्या तोंडून ऐकायचा अधिक गंमतीशीर वाटतं. त्याच्या स्किटची सुरुवातच या वाक्याने होते. हे वाक्य बोलून झाल्यानंतर तो आपले केस हवेत उडवताना दिसतो. आता त्याने त्याची हेअरस्टाइल बदलली आहे. गौरवने आपले मोठे केस छोटे केले आहेत. एका मुलाखतीत गौरवला केस कापण्यामागचं कारण विचारण्यात आलं तेव्हा गौरव म्हणाला, माझा अगामी चित्रपटासाठी मी केस कापले आहेत. पण फक्त दोन महिने मी पुन्हा माझ्या जुन्या रुपात प्रेक्षकांना दिसेन. जेव्हा मी केस कापले तेव्हा प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. अनेकांनी मी केस कापायला नको होते अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, कामासाठी मला केस कापायला लागले असं गौरव म्हणाला.
गौरवच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर गौरव लवकरच ‘अंकुश’ चित्रपटातून प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे. 6 ऑक्टोबर 2023 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात गौरव बरोबर अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर, सयाजी शिंदे, मंगेश देसाई, चिन्मय उद्घीरकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. मराठीबरोबर गौरव लवकरच हिंदी चित्रपटात झळकणार आहे. संगी असे त्या चित्रपटाचे नाव आहे. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत गौरवने या चित्रपटाबाबत माहिती दिली होती.



