सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘काव्या – एक जज्बा एक जुनून’ या मालिकेत मिश्कत वर्मा साकारणार आळशी पण प्रतिभाशाली आदिराज प्रधानची व्यक्तिरेखा
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘काव्या – एक जज्बा एक जुनून’ या आगामी मालिकेत अभिनेत्री सुम्बुल तौकीर, काव्या या महत्त्वाकांक्षी आयएएस ऑफिसरची भूमिका साकारताना दिसेल. एका सशक्त स्त्री व्यक्तिरेखेभोवती फिरणारी ही कथा कुटुंबाची मूल्ये जपत असतानाच देशसेवा करण्याचा उद्देश मनात बाळगणाऱ्या काव्याच्या प्रवासावर प्रकाश टाकेल.
ही कथा अधिक आकर्षक बनवण्याचे आश्वासन देत या बहुप्रतिक्षित मालिकेच्या कलाकारांमध्ये सामील होऊन मिश्कत वर्मा, आदिराज प्रधानची भूमिका साकारणार आहे. एका दशकाहून अधिक काळ या मनोरंजन उद्योगाचा भाग असलेल्या मिश्कतने पडद्यावर विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत आणि ‘काव्या – एक जज्बा एक जुनून’ या पुरोगामी मालिकेत सहभागी होत असल्याचा त्याला आनंद आहे.
आळशी पण प्रतिभाशाली आदिराज आपल्या हेवा वाटेल अशा नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या जोरावर सहजतेने उत्कृष्टता प्राप्त करतो. तो महिलांच्या यशाचा आणि स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. या मालिकेच्या प्रोमोची लिंक इथे दिली आहे, ज्यामध्ये आदिराज, काव्याला तिने स्वतःसाठी ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी आणि त्याही पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करताना दिसतो.
लिंक: https://www.instagram.com/p/CwE7pZWrZL9/
आपल्या भूमिकेबद्दल सविस्तर माहिती देताना मिश्कत वर्मा म्हणतो, “आदिराजची व्यक्तिरेखा साकारण्यास मी अतिशय उत्सुक आहे कारण तो भारतीय टेलिव्हिजनवर तुम्ही बघत असलेल्या सामान्य नायकांपेक्षा अगदी वेगळा आहे. ही अतिशय वास्तविक व्यक्तिरेखा आहे. तो थोडा बंडखोर, समानतेचा समर्थक आणि विनोदबुद्धी असलेला माणूस आहे. तो आयुष्य फारसे गांभीर्याने घेत नाही आणि मला या भूमिकेतून हेच आत्मसात करायचे आहे- येणारा प्रत्येक क्षण जसा येईल तसा स्वीकारण्याची त्याची क्षमता.”
लवकरच येत आहे, ‘काव्या – एक जज्बा एक जुनून’ फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
