Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उपेंद्र लिमये यांच्या " रोप " चा मुहूर्त सोहळा दगडूशेठ गणपती मंदिरात संपन्न

 उपेंद्र लिमये यांच्या ‘रोप’ चित्रपटाचा दगडूशेठ गणपती मंदिरात भव्य मुहूर्त सोहळा संपन्न...


पुण्यातील पूज्य दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित एका शानदार सोहळयात एस. एस. क्रिएशन्सच्या ‘रोप’ या आगामी चित्रपटाचा शुभमुहूर्त अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरित्या पार पाडला. यावेळी उपेंद्र लिमये यांनी ‘रोप’च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.



या सोहळयाला अभिनेते उपेंद्र लिमये, निर्माते साईनागराज आणि सौ. श्रुजना, दिग्दर्शक सूर्या, श्रुती शेट्टी, कपिल गुडसूरकर, श्री ऋषभ मोरे, बालकलाकार धृती इ. कलाकार मंडळी, तसेच कार्यकारी निर्माते कपिल जोंधळे, प्रॉडक्शन डिझायनर नेरंगलवार राज गौड, प्रोडक्शन मॅनेजर बाबासाहेब पाटील, कथालेखक बी. सुदर्शन, संवादलेखक संजय नवगिरे, संगीत दिग्दर्शक राजवीर गांगजी, कलादिग्दर्शक प्रकाश शिनगारे, धनंजय साबळे, सहदिग्दर्शक आशिष पवार, महेंद्र गाजभरे, कॉस्च्युम डिझायनर  अर्चना बुक्कावार, गीतकार मंदार चोळकर, पब्लिसिटी डिझायनर जय कुंभारे, आणि चित्रपटक्षेत्रातील इतर नामवंत मंडळी उपस्थित होती.


निर्माते नागराज आणि सौ. सृजना, धृती  यांनी चित्रपटाबाबत उत्साह व्यक्त करताना एक चांगली कलाकृती रसिक दरबारी सादर करण्याचा त्यांचा मानस असल्याचे यावेळी सांगितले. या सिनेमात प्रेक्षकांना आवडणारं सारं काही आहेच, पण त्या जोडीला एक सशक्त कथानकही आहे. त्याला श्रवणीय संगीताची किनार जोडण्यात येईल, त्यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी हा सिनेमा मनोरंजनाचं पॅकेज ठरेल असे दिग्दर्शक सूर्या यांनी यावेळी स्पष्ट केले. इतर तांत्रिक बाबींची पूतर्ता झाल्यानंतर लगेचच ‘रोप’च्या चित्रीकरणाला सुरूवात करण्यात येणार असल्याचे यावेळी दिग्दर्शक सूर्या यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.