Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अभिनेत्री आणि क्लायमेट वॉरियर भूमी पेडणेकर जिओ मामीच्या डायमेन्शन्स मुंबईच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर

 अभिनेत्री आणि क्लायमेट वॉरियर भूमी पेडणेकर जिओ मामीच्या डायमेन्शन्स मुंबईच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर 


जिओ मामी (मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज) मुंबई फिल्म फेस्टिवलतर्फे डायमेन्शन्स मुंबई या लघुपट स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवण्याचे भारतभरातील दिग्दर्शकांना आवाहन 

 

मुंहई, भारत २७ जुलै २०२३ – डायमेन्शन्स मुंबई या मुंबई शहराच्या संकल्पनेवर आधारित लघुपट स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई शहराला सलाम करण्यासाठी २००९ मध्ये जया बच्चन यांनी हा नवा विभाग सुरू केला होता. डायमेन्शन्स मुंबई ही स्पर्धा देशभरातील १८-२५ वर्ष वयोगटातील तरुण दिग्दर्शकांसाठी खास आयोजित केली जाते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांना केवळ मुंबईवर आधारित, मुंबईत केलेला लघुपट दाखल करावा लागतो. 



भारतीय सिनेमा क्षेत्रातील आघाडीच्या कलाकारांमधील आश्वासक नाव भूमी पेडणेकर वेगळ्या धाटणीच्या सिनेमांसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईकर असलेल्या भूमी पेडणेकर यांची डायमेन्शन्स मुंबईच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या डायमेन्शन्स मुंबईत सहभागी होणाऱ्या तरुण, सर्जनशील आणि उदयोन्मुख दिग्दर्शकांशी संवाद साधतील. 


याविषयी भूमी पेडणेकर म्हणाल्या, ‘यावर्षी डायमेन्शन्स मुंबईत सहभागी होताना मला आनंद होत आहे. हे व्यासपीठ तरुण दिग्दर्शकांसाठी उत्तम आहे आणि त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी सांगण्यासाठी पाठिंबा देणारं आहे. या व्यासपीठाच्या मदतीने त्यांना मोठ्या प्रेक्षकवर्गापुढे मोठ्या पडद्यावर आपली कलाकृती सादर करता येईल. असामान्य गुणवत्ता असलेल्या दिग्दर्शकांना मुंबईत मिळणाऱ्या डायमेन्शन्स मुंबईसारख्या व्यासपीठाच्या मदतीने आपल्या गुणवत्तेचा पूर्ण क्षमतेसह वापर करण्याची संधी मिळेल. एक मुंबईकर या नात्याने मला कायमच या शहराची भुरळ पडली आहे. या दिग्दर्शकांशी संवाद साधण्यासाठी मी उत्सुक आहे. माझ्यामुळे त्यांच्या कौशल्यावर सकारात्मक प्रभाव निर्माण करता आला, तर मला खरंच आनंद होईल व त्यासाठी मी नेहमी ऋणी राहीन.’



जिओ मामीच्या फेस्टिवल संचालक अनुपमा चोप्रा डायमेन्शन्स मुंबईमध्ये भूमी पेडणेकर यांचे स्वागत करताना म्हणाल्या, ‘भूमी अतिशय गुणवान आणि चोखंदळ कलाकार आहे. दम लगा के हैशा या पहिल्याच सिनेमापासून तिनं हिंदी सिनेमाच्या कक्षा रूंदावण्यास सुरुवात केली. डायमेन्शन्स मुंबईसाठी तिचं ब्रँड अ‍ॅम्बेसिडर असणं उत्सुकतापूर्ण आहे. देशभरातील तरुण दिग्दर्शकांना आपल्या मातीतल्या अस्सल कथा सांगण्यासाठी प्रेरणा देणं, तशी संस्कृती निर्माण करणं हे डायमेन्शन्स मुंबईचं उद्दिष्ट आहे. नवे, उभरते आवाज आणखी समृद्ध होण्यासाठी लघुपट आवश्यक आहेत. या क्षेत्रासाठी आत्ताचा काळ पूरक आहे आणि त्यासाठी भूमीसारख्या सरस अभिनेत्रीशी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे.’

डायमेन्शन्स मुंबई हा भारतातील सर्वात मोठ्या लघुपट स्पर्धांपैकी एक आहे. या व्यासपीठावर देशातील तरुण मनं एकत्र येऊन मुंबईविषयी आपला वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोन मांडतात. फिल्म फेस्टिवलदम्यान सिनेमा क्षेत्रातील दिग्गजांबरोबर होणारी चर्चा, कार्यशाळा आणि परिसंवाद हे जिओ मामीचं वैशिष्ट्य आहे आणि डायमेन्शन्स मुंबईच्या माध्यमातून तरुण दिग्दर्शकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. 

यापूर्वी ही स्पर्धा केवळ मुंबईकरांपुरती मर्यादित होती, मात्र यंदा या स्पर्धेने आपले क्षितिज विस्तारत देशभरातील दिग्दर्शकांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. डायमेन्शन्स मुंबई ही स्पर्धा १८ ते १५ वर्ष वयोगटातील दिग्दर्शकांसाठी खुली आहे. त्यांना या स्पर्धेसाठी मुंबई शहरावर आधारित ५ मिनिटांचा लघुपट दाखल करावा लागेल. नामवंत परीक्षक मंडळ काळजीपूर्वक हे लघुपट पाहातील आणि सर्वोत्कृष्ट तीन लघुपटांचा जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटनप्रसंगी सन्मान केला जाईल. 



जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिवलच्या आर्टिस्टिक डिरेक्टर दीप्ती डिकुन्हा म्हणाल्या, ‘जिओ मामीमध्ये आम्ही तरुण, स्वतंत्र दिग्दर्शकांच्या क्षमता दर्शवणारं काम पाहाण्यासाठी उत्सुक असतो. डायमेन्शन्स मुंबई ही स्पर्धा त्यांचे काम या क्षेत्रातील नामवंत आणि अधिक मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी उचललेलं पाऊल आहे. डायमेन्शन्स मुंबई या लोकप्रिय स्पर्धेला भरभरून प्रतिसाद लाभेल अशी आमची अपेक्षा आहे. या स्पर्धेचा आम्हाला विशेष अभिमान वाटतो, कारण त्यात सहभागी झालेल्या कित्येक दिग्दर्शकांचे आज या क्षेत्रात आदराने नाव घेतले जाते. त्यांचा प्रवास जिओ मामीपासून सुरुवात झाला ही भावना सुखद आहे. त्यांच्यासारखी अनेक यशस्वी नावं तयार करण्याची आमची इच्छा आहे.’


तरुण दिग्दर्शक आणि त्यांच्या खास लघुपटांचे स्वागत करण्यासाठी जिओ मामी सज्ज असून हे लघुपट फेस्टिवलमध्ये दाखवले जातील. देशभरातील दिग्दर्शकांचा डायमेन्शन्स मुंबईच्या माध्यमातून सिनेमा क्षेत्राच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. प्रवेशिका स्वीकारण्याची सुरुवात २७ जुलै २०२३ रोजी सुरू होणार असून शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२३ आहे. 

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.