प्रसिद्ध गायक पद्मश्री सोनू निगम यांचा 50 वा वाढदिवस दणक्यात साजरा
भारतीय मनोरंजन क्षेत्रात गेली कित्येक वर्षे चाहत्यांच्या मनावर आपल्या जादुई आवाजाने मोहिनी करणाऱ्या गायक पद्मश्री सोनू निगम यांचा शनिवारी रात्री उशिरा केक कापून 50 वा वाढदिवस मोठ्या धडाक्यात साजरा करण्यात आला. 30 जुलै हा सोनू यांचा वाढदिवस दिन आहे .
चित्रपटसृष्टीत सोनू चे मोठे चाहते असून त्यात सर्वच वयोगटातील निस्सीम चाहता वर्ग आहे .
मराठी - हिंदी चित्रपसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार दोनुचे शुभचिंतक असल्याने त्याच्या 50 व्या वाढदिवशी जबरदस्त गर्दी होणार हे निश्चितच होते .
मनसे प्रमुख राज ठाकरे , शबाना आझमी , आगम निगम , टिषा आणि मीनल निगम , आनंदजी , हरिहरन , अमृता फडणवीस , जॅकी श्रॉफ , मराठीतील खास मित्र सचिन पिळगावकर आणि मुलगी श्रिया , पापोन , अन्नू मलिक , भूषण कुमार आपल्या मातोश्री सुदेश कुमारी , शेफ संजीव कपूर , जितेंद्र , संजय टंडन , सुनिधी चौहान, अमित कुमार , शान, सलीम मर्चंट , तलत अझीझ , स्मिता ठाकरे , रुपकुमार राठोड , रोहित रॉय , सुदेश भोसले, सुरेश आणि पद्मा वाडकर ,
दारा सिंग , सतीश शाह , नील मुकेश , नितीन मुकेश , अनुप जलोटा , निखिल कामत , रुबल नेगी , आनंद मिलिंद , श्रुती पाठक , मीत बंधू , हरमित आणि मनमित , समीर दाते , रमेश तौरानी , मोहम्मद आणि लकी मोरानी, गौरव शर्मा , अंकित तिवारी , राहुल वैद्य यासारख्या अनेक दिग्गजांनी सोनूला शुभेच्छा दिल्या .
याप्रसंगी सोनू यांनी आजवरच्या प्रवासात अनेकांनी मदतीचा हात दिल्याचा आवर्जून उल्लेख केला . मला विविध गुरूंचे मार्गदर्शन लाभले , मी अजूनही शिकतोय आणि हा प्रवास असाच सुरू राहील , सर्वांचे आशीर्वाद हवेत असे सांगितलें.
मला अजून खूप काही शिकायचे आहे त्यासाठी वरिष्ठांनी नेहेमी सारखे त्यांचे अनमोल मार्गदर्शन तसेच थोरांनी वडिलकीच्या सल्ला देत रहावा , आधी अपेक्षा व्यक्त केली .