Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

" सन्मान महाराष्ट्राचा 2023 " पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न

 *'सन्मान महाराष्ट्राचा २०२३' दिमाखदार पुरस्कार सोहळा संपन्न*



‘महाराष्ट्र’ या नावातच सर्व काही सामावलेलं आहे. समाजकारण, अर्थकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, संगीत, कला, राजकारण या सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्रानं यशाची परंपरा जपत अटकेपार झेंडे रोवले आहेत. अशा महाराष्ट्राच्या असामान्य धुरिणींचा आणि संस्थांचा सन्मान करणारा 'सन्मान  महाराष्ट्राचा २०२३' हा दिमाखदार सोहळा नुकताच  एमएमआरडीए मैदानामध्ये संपन्न झाला. 



महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 'अर्थ’ संस्थेतर्फे आयोजित केलेल्या 'सन्मान महाराष्ट्राचा २०२३' या रंगारंग सोहळ्यात  महाराष्ट्रातील कर्तृत्ववान, प्रतिभावान आणि राज्याला गौरव प्राप्त करून देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, चित्रपट आणि आरोग्य अशा क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम काम करणाऱ्यांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला. सामाजिक, राजकीय आणि कला क्षेत्रातील  असंख्य मान्यवर मंडळी याप्रसंगी उपस्थित होती.



'सन्मान महाराष्ट्राचा २०२३' हा पुरस्कार घेताना आनंद तर आहेच पण अशा पुरस्कारांनी जी शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडते ती खूप प्रेरणादायी ठरते,  असे सर्वच पुरस्कार विजेत्यांनी यावेळी बोलून दाखविले.  



दीपप्रज्वलना नंतर ‘लाभले आम्हांस भाग्य’ या अभिमानगीताने आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृती जागवत,  त्यांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन करून या सोहळ्याचा शुभारंभ  करण्यात आला. गणेशवंदना, शेतकरी, वारी, धनगरी, कोळी वासुदेव, लावणी, गोंधळ, शिवराज्याभिषेक अशा महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृती, परंपरेची झलक या सोहळ्यात घडविण्यात आली. मयुरेश पेम, नेहा  महाजन, मीरा जोशी, अंशुमन विचारे,  मेघा घाडगे, सोनाली पाटील, प्रणव रावराणे,  माधव देवचक्के,   मयुरेश वाडकर, अस्मिता सुर्वे  आदि कलाकारांच्या बहारदार सादरीकरणाने सोहळ्यात रंगत आणली.  या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि अभिनेत्री समीरा गुजर-जोशी यांनी केले.



महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत योगदान दिलेल्या मान्यवरांची ओळख समाजाला व्हावी, या हेतूने आम्ही 'सन्मान महाराष्ट्राचा २०२३' हा पुरस्कार सोहळा आयोजित केला असल्याचे सांगत समाजासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्यांचा सन्मान करण्याची संधी ‘अर्थ’ फाऊंडेशनला मिळाली हा आमचा देखील गौरव आहे, अशा भावना व्यक्त करत अर्थ संस्थेचे सर्वेसर्वा प्रवीण कलमे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले

*सन्मानित मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे -* 


पद्मश्री श्री. दादा इदाते (सामाजिक क्षेत्र)


पद्मश्री श्री. गिरीश प्रभुणे (शैक्षणिक क्षेत्र)


पद्मश्री श्रीमती राहीबाई पोपेरे (बीजमाता, कृषी क्षेत्र)


श्री. शैलेश गांधी,  माजी माहिती आयुक्त, भारत सरकार (सामाजिक क्षेत्र)


श्री. अनिल गलगली (सामाजिक क्षेत्र)


श्रीमती हेमा राचमाले (सामाजिक क्षेत्र) परदेशात राहून भारतीयांसाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत.  


श्री. प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र, (प्रशासकीय क्षेत्र)


कुमारी अवंतिका चव्हाण (क्रीडा क्षेत्र )


श्री. मनीष अडविलकर (क्रीडा क्षेत्र )


चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक  श्री. महेश कोठारे (सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्र)


अभिनेता आकाश ठोसर (सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्र)


संगीतकार श्री. अविनाश चंद्रचूड व श्री. विश्वजीत जोशी  (सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्र)


श्री. महेश झगडे, माजी आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, (आरोग्य क्षेत्र) 


डॉ. पंकज चतुर्वेदी, उप-संचालक, टाटा मेमोरियल सेंटर, ( आरोग्य क्षेत्र)


श्री. योगेश लखानी, संस्थापक आणि अध्यक्ष, ब्राइट आउटडोअर मीडिया, (उदयॊग क्षेत्र)     


श्री. नितीन पोतदार, (आर्थिक क्षेत्र)


श्री. यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत (मराठी पत्रकारिता क्षेत्र)



श्री. धर्मेंद्र जोरे, राजकीय संपादक, मिड-डे ( इंग्रजी पत्रकारिता क्षेत्र)


श्रीमती पॉला मॅकग्लिन, सीईओ, भाडिपा (डिजिटल क्षेत्र)


श्रीमती मधुरा बाचल, मधुराज  रेसिपी, (डिजिटल क्षेत्र)


फोकस इंडिया (डिजिटल क्षेत्र)


श्री. रतन लथ, अध्यक्ष, फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडेमी (शैक्षणिक क्षेत्र )


श्री. प्रोफेसर उल्हास बापट संविधान तज्ञ  (शैक्षणिक क्षेत्र )


लेखक- दिग्दर्शक श्री. दिग्पाल लांजेकर (सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्र)


श्रीमती रंजिता रोहन पाटील (क्रेझी फूडी रंजिता)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.