ऑफस्क्रीन मस्ती! ‘सरू’च्या कलाकारांसोबत शगुन पांडे आणि मोहक मटकर यांनी खेळला खो खो!
झी टीव्हीवरील नवीन मालिका ‘सरू’ आपल्या गावाकडच्या पार्श्वभूमीवरील भावस्पर्शी कथा, दमदार अभिनय आणि वास्तवदर्शी मांडणीमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. परंपरा, कौटुंबिक नाती आणि वैयक्तिक विकास यांचे सुंदर मिश्रण या मालिकेत पाहायला मिळते. आणि येत्या भागात प्रेक्षकांसाठी एक मजेशीर ट्विस्ट असणार आहे — जेव्हा वेद (शगुन पांडे) आणि सरू (मोहक मटकर) खो-खो खेळताना दिसतील. हा प्रसंग कथानकात ऊर्जा तर निर्माण करेलच, पण कलाकार आणि टीमसाठी तो बालपणीच्या आठवणीही जागवणारा ठरणार आहे.
या प्रसंगाचे चित्रीकरण सुरू असताना, लोकप्रिय अभिनेता शगुन आणि मोहक या खेळामध्ये इतके रंगून गेले की सुट्टीच्या वेळेतही त्यांनी खेळ चालू ठेवायचा ठरवले. जो एक ठरवलेला सीन म्हणून सुरू झाला होता, त्याचे आता एका सामन्यामध्ये रूपांतर झाले, कारण कलाकार आणि क्रूतील इतर सदस्यही त्यात सामील झाले. सेट एका मिनी प्लेग्राउंडमध्ये बदलला — सगळे अगदी शाळेत असताना जसं करत असत तसे हसत, धावत आणि एकमेकांना प्रोत्साहन देत होते. त्यामुळे वातावरण अगदी बदलून गेले आणि सर्वांच्या लाहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
शगुन पांडे म्हणाला, “खरं सांगायचं तर, असं वाटलं की जणू आपण परत शाळेच्या दिवसांत गेलो आहोत. खो-खो माझ्या बालपणाचा खूप महत्त्वाचा भाग होता, आणि तो पुन्हा मोहक आणि संपूर्ण टीमसोबत खेळताना खरंच खूप आनंद झाला. आम्ही लहान मुलांसारखे सगळं विसरून इकडे तिकडे धावत होतो. मला आठवतंय, मैदानावर अनवाणी खेळायचो, उशीराने घरी गेल्यावर ओरडा खायचो, आणि लहानसहान खरचटलेले हातपाय अभिमानाने दाखवायचो – जणू ती ट्रॉफीच असायची. तीच ऊर्जा पुन्हा सेटवर अनुभवायला मिळणं, तेही सगळ्यांनी एकत्र येऊन, हे खूप खास होतं. आम्ही खूप तास काम करतो आणि कधी कधी थांबून मजा करायचं विसरतो, म्हणून असे क्षण खरोखरच एक फ्रेश ब्रेकसारखे वाटतात. यामुळे संपूर्ण टीममध्ये एक वेगळं नातं तयार झालं, आणि मला वाटतं हा आनंद प्रेक्षकांपर्यंतही पोहोचेल.”
जसे कलाकारांनी ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन दोन्हीकडे धमाल केली, तसेच ‘सरू’च्या आगामी भागांमध्ये भरपूर नाट्य पाहायला मिळणार आहे. सरू (मोहक मटकर) ला अखेर कळेल का की तीच खरी बजाज कुटुंबाची नात आहे? की अनिका (अनुष्का मर्चंडे) तिच्या कपटी योजना यशस्वी करत सरूला घराबाहेर काढण्यात यश मिळवेल?
पहा ‘सरू’ दररोज संध्याकाळी 7:30 वाजता फक्त झी टीव्हीवर, जिथे नाट्यमय घडामोडी अधिक गहिऱ्या होतील आणि नवीन रहस्यांचा उलगडा होईल!