*प्रभात चित्र मंडळाच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन*
प्रभात चित्र मंडळ या फिल्म सोसायटीच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्ताने प्रभात चित्र मंडळातर्फे दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार,दिनांक १९ जुलै २०२५ रोजी , सायं. ६.३० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, चर्चगेट येथे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संत तुकाराम पुरस्काराने गौरवण्यात आलेला रावबा गजमल दिग्दर्शित ‘सांगळा’ या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. तर प्रभातच्या ठाणे शाखेतर्फे रविवार ,दिनांक २० जुलै २०२५ रोजी सायं. ६.३० वाजता ‘श्याम बेनेगल यांच्या चित्रपटातील संगीत’ हा विशेष कार्यक्रम श्री. अजेय गंपावार सादर करणार आहेत. हा कार्यक्रम मराठी ग्रंथसंग्रहालय, स्टेशन रोड ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहत या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रभात चित्र मंडळाचे सचिव डॉ. संतोष पाठारे यांनी केले आहे.