Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र दिनाला प्रवाह पिक्चरवर पहा महाराष्ट्राचा लाडका सिनेमा अशी ही बनवाबनवी

 महाराष्ट्र दिनाला प्रवाह पिक्चरवर पहा महाराष्ट्राचा लाडका सिनेमा अशी ही बनवाबनवी

 

गेली ३६ वर्ष महाराष्ट्राचं भरभरुन मनोरंजन करणाऱ्या अशी ही बनवाबनवी सिनेमाची जादू जराही कमी झालेली नाही. जेव्हा जेव्हा हा सिनेमा टीव्हीवर पहाण्याची संधी मिळते अगदी तेव्हा तेव्हा प्रेक्षक या सिनेमाचा आनंद लुटतात. प्रेक्षकांचा हा लाडका सिनेमा १ मे ला म्हणजेच महाराष्ट्र दिनाला प्रवाह पिक्चरवर पहाता येणार आहे.



अशी ही बनवाबनवी सिनेमातले धनंजय माने इथेच रहातात कासत्तर रुपये वारलेहा माझा बायको पार्वती हे संवाद आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. याचं श्रेय जातं ते दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगांवकरपद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सराफअभिनेत्री निवेदिता जोशीसुप्रिया पिळगांवकरअश्विनी भावे आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, सुशांत रे आणि सुधीर जोशी यांना. या दिग्गजांनी आपल्या सहजसोप्या अभिनयाने या कलाकृतीला अजरामर केलं. या कलावंताच्या सदाबहार अभिनयाने नटलेली ही सदाबहार कलाकृती नक्की पहा गुरुवार १ मे ला दुपारी १ आणि रात्री ८ वाजता फक्त प्रवाह पिक्चरवर. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.