Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्टार प्रवाहचे कलाकार जल्लोषात स्वागत करणार गणरायाचं

स्टार प्रवाहचे कलाकार जल्लोषात स्वागत करणार गणरायाचं स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४ मधून उलगडणार खजिना बाप्पाच्या गोष्टींचा
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे १० दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात. लाडक्या बाप्पाचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज आहे. मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांच्या अभिरुचीचा मान ठेवत नेहमीच दर्जेदार कलाकृती सादर केल्या आहेत.
स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२४ या गणपती विशेष कार्यक्रमातून यंदा उलगडणार आहे खजिना बाप्पाच्या गोष्टींचा. कधीही न ऐकलेल्या आणि पाहिलेल्या बाप्पाच्या गोष्टी स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४ कार्यक्रमातून नृत्यनाटिकेच्या रुपात आपल्यासमोर उलगडतील. स्टार प्रवाह परिवारातले जवळपास १०० कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून गणरायाचा उत्सव साजरा करणार आहेत.
या गणपती विशेष कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडलीय थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतील मानसी आणि तेजस म्हणजेच समीर परांजपे आणि शिवानी सुर्वे यांनी. तर सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत आणि लोकप्रिय अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी देखिल आपल्या खुमासदार सादरीकरणाने या कार्यक्रमाची रंगत वाढवली आहे.
स्टार प्रवाहचा धिंगाणेबाज कलाकार अर्थातच सिद्धार्थ जाधवने देखिल कलाकारांसोबत धिंगाणा घालत जल्लोष केला आहे. तेव्हा पाहायला विसरु नका रविवार १ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजल्यापासून स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२४.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.