रोज कुछ नया बनते रहो’ मनोज बाजपेयी यांचे उद्बोधक कथन
October 28, 2023
0
‘रोज कुछ नया बनते रहो’ मनोज बाजपेयी यांचे उद्बोधक कथन
सतत काही नवे शोधण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आजच्या गतिशील तरुणांच्या बहुविधतेचा वेध
मुंबई. -- सर्वात मोठ्या घरगुती व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या 'झी-फाइव्ह'ने दर्शकांच्या मानसिकतेतील अंतर्निहित बदल प्रतिबिंबित करणार्या एका विचारप्रवर्तक जाहिरातपटाद्वारे आज आपल्या कंटेंट ब्रँडच्या जाहीरनाम्याचे अनावरण केले. लोक आपल्या जीवनात ज्या प्रवाहीपणाने निवडी करू लागले आहेत, स्वतःमधील गुण विकसीत करू लागले आहेत आणि नव्या, अज्ञात जाणिवा धुंडाळू लागले आहेत, त्यांचे चित्रण हा चित्रपट करतो. त्या अर्थाने अल्पसंतुष्ट राहण्याच्या मानसिकतेच्या विरोधात हा चित्रपट जातो.
या जाहिरातपटात ‘रोज कुछ नया बनते रहो’ हे तत्त्वज्ञान दाखवण्यासाठी एका शिल्पकाराच्या कारागिरीचा वापर करण्यात आला आहे. मूस, आकार, छन्नी यांचा वापर करून वेगवेगळे साहित्य, नवीन शैली आणि पोत यांच्या माध्यमातून हा शिल्पकार एकच एक कलाकृती पुनःपुन्हा वेगवेगळ्या धाटणीने तयार करतो. मूळ स्वरूप कायम ठेवून तो ही कलाकृती सतत तयार करतो, फोडतो आणि वेगळ्या रुपात पुन्हा घडवतो. आपल्या प्रत्येकातील बहुविधतेचे आणि आताच्या कार्यरत राहणाऱ्या तरूण पिढीच्या निरंतर उत्क्रांतीचे हे दृष्यात्मक रूपक आहे. "बहते रहो, आकार लेते रहो, रोज कुछ नया बनते रहो" या प्रेरणादायी काव्यात्मक ओळींतून दर्शकांना ही तरलता स्वीकारण्याचे आवाहन केले जाते. चित्रपटाचा शेवट एका मार्मिक प्रश्नाने होतो – “आज क्या बनोगे?”
अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या उद्बोधक कथनाने हे दृश्य रूपक आणखी रंजक झाले आहे. त्यांच्या विशिष्ट संवादफेकीने चित्रपटात एक व्यक्तिरेखा निर्माण झाली आहे. ती खरोखरच बहुविधतेच्या भावनेला मूर्त रूप देते. नाट्यक्षेत्रातून पुढे आलेले मनोज वाजपेयी यांनी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका केल्या आहेत आणि स्वतःमधील अष्टपैलू अभिनेता जागविला आहे. आता निर्माता म्हणून त्यांनी नवीन वळण घेऊन सर्जनशील अभिव्यक्तीच्या सीमाही ओलांडल्या आहेत. मनोज यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या घोषवाक्याने हा चित्रपट सुरू होतो आणि त्यातील कलाकारासोबतचा दर्शकांचा संबंध आणखी बळकट होत जातो.
मनोज वाजपेयी, अभिनेता म्हणाले,“दर्शकांच्या नाडीवर बोट ठेवणारे व्यासपीठ या नात्याने झी-फाइव्ह आपल्या नवीन 'कंटेंट ब्रँड मॅनिफेस्टो'द्वारे एक अतिशय समर्पक आणि गंभीर संदेश देत आहे. लोकांना लेबलांनी बांधून राहायचे नसते आणि स्थिर बसून राहण्याऐवजी चैतन्याने सळसळत राहायचे असते. अशावेळी आपल्या दर्शकांच्या आकांक्षा उंचावण्याच्या हेतूने झी-फाइव्ह काही कथा सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. यातून हा प्लॅटफॉर्म दर्शकांच्या आत्म-शोधाच्या मार्गाला चालना देत आहे. मला स्वतःलाही एक कलाकार म्हणून विविध भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच माझ्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू शोधण्यात मदत झाली. 'झी-फाइव्ह'च्या कार्यक्रमाचा भाग असलेल्या एका व्यक्तीच्या रूपात असा समर्पक संदेश देणारा आवाज म्हणून काम करताना मला अधिक आनंद झाला.”
कार्तिक महादेव, कंटेट एसबीयू, मुख्य विपणन अधिकारी, झी-फाइव्ह म्हणाले, “आपल्या कामात व्यग्र असलेली आजची तरुण पिढी काही नाविन्य शोधत असते. या मानसिकतेचा विचार करून या तरुणाईला प्रोत्साहन देणारा झी-फाइव्ह प्लॅटफॉर्म आपल्या सामग्रीद्वारे सर्वांना आमंत्रित करीत आहे. प्रत्येकाला स्वतःमधील असंख्य गुणविशेष शोधता यावेत, ते जोपासता यावेत, यासाठी 'झी-फाइव्ह'ने हा एकावेळी एक कथा अशी काही रुपके सादर केली आहेत. यांमध्ये भावनेला हात घालणाऱ्या नाटकांपासून माहितीपटांपर्यंत, विनोदापासून चित्तथरारक कार्यक्रमांपर्यंत, भारतापासून ते जगभरापर्यंत असंख्य प्रकारचे कार्यक्रम सादर होणार आहेत. 'झी-फाइव्ह'च्या या समृद्ध आणि विविधांगी सादरीकरणामध्ये माणसांच्या कल्पना, स्वप्ने, श्रद्धा, विश्वास, शक्यता आणि वर्तन यांचा आविष्कार प्रकट करण्याची, त्यांना प्रेरणा देण्याची आणि आकार देण्याचीही क्षमता आहे.”